Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 28:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 परमेश्वर आपले कार्य, आपले अपूर्व कार्य करण्यास, आपली कृती, आपली विलक्षण कृती सिद्धीस नेण्यास परासीम डोंगरावर उठल्याप्रमाणे उठेल, गिबोन खोर्‍यातल्याप्रमाणे क्षुब्ध होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 जसा परासीम डोंगरामध्ये परमेश्वर उभा राहिला होता, जसा तो गिबोन दरीत रागावला होता त्याप्रमाणे तो रागावेल. अशासाठी की त्याने आपले कार्य, त्याचे अद्भूत कृत्य आणि त्याचे विस्मयकारी कृत्य करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 त्यांचे कार्य करण्यासाठी, त्यांचे विक्षिप्त काम, आणि त्यांचे कठीण कार्य, होय, त्यांचे अद्भुत कार्य सिद्ध करण्यासाठी, जसे ते पेराझीम पर्वतावर राहिले होते, तसे याहवेह उभे राहतील, जसे गिबोनच्या खोऱ्यामध्ये केले होते, तसे स्वतःला उभारतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 28:21
21 Iomraidhean Croise  

मग दावीद बाल-परासीम येथे आला; तेथे दाविदाने त्यांचा संहार केला; तो म्हणाला, “परमेश्वर माझ्यापुढे चालून पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूंवर तुटून पडला.” ह्यावरून त्या ठिकाणाचे नाव बाल-परासीम (तुटून पडण्याचे ठिकाण) असे पडले.


परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले आणि गेबापासून गेजेरापर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला.


ते बाल-परासीम येथे आले; तेथे दाविदाने त्यांचा संहार केला; तो म्हणाला, “देव पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूंवर माझ्या हस्ते तुटून पडला;” ह्यावरून त्या ठिकाणाचे नाव बाल-परासीम (तुटून पडण्याचे ठिकाण) असे पडले.


देवाच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले आणि गिबोना-पासून गेजेरापर्यंत तो पलिष्ट्यांच्या सैन्याला मार देत गेला.


माझ्यासाठी दुष्कर्म्यांविरुद्ध कोण उठेल? अनीती करणार्‍यांविरुद्ध माझ्यासाठी कोण उभा राहील?


ह्यास्तव प्रभूने सीयोन डोंगर यरुशलेम ह्यासंबंधाने आपले समग्र कार्य समाप्त केल्यावर असे होईल की अश्शूरचा राजा ह्याच्या मनातील गर्वाचा परिणाम व त्याच्या उन्मत्त दृष्टीचा दिमाख ह्यांचा बदला मी घेईन.


जेव्हा जेव्हा तो येईल तेव्हा तेव्हा तो तुम्हांला ग्राशील; नित्य सकाळी, रात्री व दिवसा तो येईल; हा संदेश कळल्याने दहशत पोहचेल.


तर पाहा, मी ह्या लोकांशी अद्भुत प्रकारे वर्तण्यास प्रवृत्त होतो; मी अद्भुत व आश्‍चर्यकारक कृत्य करीन, तेव्हा त्यांच्यातील ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट होईल, त्यांच्यातील बुद्धिमानांची बुद्धी लुप्त होईल.”


कारण त्याचे वंशज आपल्यामध्ये माझ्या हातून झालेले काम पाहतील तेव्हा ते माझे नाम पवित्र मानतील; याकोबाच्या पवित्र प्रभूस पवित्र मानतील व इस्राएलाच्या देवाचे भय बाळगतील.


अग्नी जसा काड्याकुड्या जाळतो व पाणी उकळवतो तसा तू आपल्या शत्रूंना आपले नाम प्रकट करण्यासाठी उतरला असतास;


तुमच्या दुष्कर्मांचे आणि तुमच्या वाडवडिलांनी पर्वतावर धूप जाळला व टेकड्यांवर माझा अपमान केला त्या दुष्कर्मांचे फळ मी त्यांना देईन,” असे परमेश्वर म्हणतो; “मी आधी त्यांच्या कर्मांचे फळ त्यांच्या पदरी मोजून घालीन.”


तुझे सर्व वल्लभ तुला विसरले आहेत; ते तुला विचारत नाहीत; तुझ्या घोर दुष्कर्मामुळे तुझी पातके फार झाल्यामुळे तुला शत्रूप्रमाणे जखम करून, क्रूर जनांप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे.


येणारेजाणारे सर्व तुला पाहून टाळ्या वाजवतात; ते यरुशलेमकन्येकडे पाहून धुत्कारतात व डोके हलवून म्हणतात, “जिला सौंदर्याची खाण, सर्व पृथ्वीचे आनंदभुवन म्हणतात, ती हीच का नगरी?”


तो कोणास मुद्दाम पीडा करीत नाही, मानवपुत्रांना दु:ख देत नाही.


आमच्या बंदिवासाच्या बाराव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या पंचमीस यरुशलेमेहून एक मनुष्य सुटून पळून आला आणि त्याने सांगितले की, ‘नगराचा नाश झाला आहे.’


राष्ट्रांनो, लक्ष देऊन पाहा व आश्‍चर्यचकित व्हा. कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो, तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास धरणार नाही.


परमेश्वराने इस्राएलापुढे त्यांची गाळण उडवली. त्यांनी गिबोनात त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले.


ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर केलेल्या मोठाल्या गारांच्या वर्षावामुळे ते ठार झाले; इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांनी मेले.


परमेश्वराने अमोर्‍यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा परमेश्वराशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; “हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोर्‍यावर स्थिर हो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan