Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 28:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 जेव्हा जेव्हा तो येईल तेव्हा तेव्हा तो तुम्हांला ग्राशील; नित्य सकाळी, रात्री व दिवसा तो येईल; हा संदेश कळल्याने दहशत पोहचेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 जेव्हा तो पार जाईल तेव्हा तो तुला झाकून टाकेल. आणि रोज रोज सकाळी, दिवसा आणि रात्री तो पार जाईल. आणि जेव्हा संदेश कळेल, तर ते भयच असे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 जितक्या वेळेस ते येईल तितक्या वेळेस ते तुम्हाला वाहवत घेऊन जाईल; रोज सकाळी, दिवसभर आणि रात्रभर, ते आरपार झाडत राहील.” हा संदेश समजून घेतल्याने अत्यंत भीती निर्माण होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 28:19
26 Iomraidhean Croise  

होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूराच्या राजाने शोमरोन सर केले व इस्राएल लोकांना अश्शूर देशात नेऊन हलह व हाबोर येथे व गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरांतून वसवले.


हिज्कीया राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांवर चढाई करून ती घेतली.


म्हणून इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो,“पाहा, मी यरुशलेम व यहूदा ह्यांवर एवढे अरिष्ट आणणार आहे की ज्याच्या कानावर ते जाईल त्याचे दोन्ही कान भणभणतील.


परमेश्वराने आपले सेवक संदेष्टे ह्यांच्या द्वारे सांगितलेल्या वचनाप्रमाणे यहूदाचा नाश करावा म्हणून त्याच्यावर खास्दी, अरामी, मवाबी व अम्मोनी ह्यांच्या टोळ्या पाठवल्या.


त्याला दहशत चोहोकडून घाबरे करते; ती त्याचा पिच्छा पुरवते.


त्या सर्वांना प्रभातसमय मृत्युच्छायाच भासतो; त्यांना मृत्युच्छायेच्या भयाचा चांगला अनुभव असतो.


पाहा, त्याला धरू पाहणार्‍याची आशा निष्फळ होते; त्याला पाहूनच एखादा गांगरून जाणार नाही काय?


सर्वसमर्थाचे तीर माझ्या देहात शिरले आहेत, त्यांचे विष माझा जीव शोषून घेत आहे; ईश्वराकडून आलेली संकटे माझ्याविरुद्ध सज्ज झाली आहेत.


माझ्या ठायी माझ्या हृदयाला यातना होत आहेत; मरणाचे भय माझ्यावर कोसळले आहे.


मी तरुणपणापासून पीडा पावून मरणोन्मुख झालो आहे; तुझ्या भीतीने मी व्याकूळ झालो आहे.


पाहा, त्यांचे वीर बाहेर रडत आहेत; शांतीचा संदेश आणणारे स्फुंदून स्फुंदून रडत आहेत.


मग खानगी कारभारी एल्याकीम बिन हिज्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे आपली वस्त्रे फाडून हिज्कीयाकडे आले व त्यांनी त्याला रब-शाके ह्याचे बोलणे कळवले.


ते त्याला म्हणाले, “हिज्कीया असे म्हणतो की, ‘आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमान ह्यांचा आहे, कारण मुले जन्मायला आली पण प्रसवण्याची शक्ती नाही.


शिणलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे; तो रोज रोज सकाळी मला जागे करतो; शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो.


असे म्हण, ‘अहो यहूदाच्या राजांनो, व अहो यरुशलेम-निवासी जनांनो, परमेश्वराचे वचन ऐका; सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, ह्या स्थळावर मी अरिष्ट आणतो, त्याविषयी जो कोणी ऐकेल त्याचे कान भणभणतील.


यहूदात पुकारा, यरुशलेमेत जाहीर करा, आणि म्हणा की, “देशात रणशिंग फुंका; जोराने ओरडून म्हणा, ‘एकत्र व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात जाऊ.’


“परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की राजाचे व सरदारांचे काळीज ठाव सोडील; याजकांची त्रेधा उडेल आणि संदेष्टे भयचकित होतील.”


आम्ही त्यांचा लौकिक ऐकला आहे, आमचे हात गळून गेले आहेत; आम्हांला क्लेश झाला आहे. प्रसवणार्‍या स्त्रीप्रमाणे वेणा लागल्या आहेत.


तू पर्वणीच्या दिवसाप्रमाणे दहशतीच्या बाबी माझ्याकडे चोहोकडून बोलावल्या; परमेश्वराच्या क्रोधदिनी कोणी पळून जाऊन किंवा निभावून राहिला नाही; ज्यांचे मी लालनपालन केले, त्यांचा माझ्या शत्रूने फडशा उडवला आहे.”


ह्या गोष्टींचे कथन येथे संपले. मी दानीएल ह्या कल्पनांनी व्याकूळ झालो, आणि माझी चर्या पालटली; तरी मी हे सर्व आपल्या मनात ठेवले.


मग मी दानीएल मूर्च्छित झालो व काही दिवस आजारी पडलो; त्यानंतर मी उठून राजाचे कामकाज करू लागलो. हा दृष्टान्त पाहून मी विस्मित झालो; पण तो कोणास कळला नाही.


मी हे ऐकले तेव्हा माझे काळीज थरथरले, त्याच्या आवाजाने माझे ओठ कापले; माझी हाडे सडू लागली; माझे पाय लटपटत आहेत; ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल, त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे.


परमेश्वर शमुवेलास म्हणाला, “पाहा, मी इस्राएलात अशी गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan