Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 28:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मृत्यूबरोबर केलेला तुमचा करार रद्द होईल; अधोलोकाबरोबर केलेला तुमचा संकेत टिकणार नाही; संकटाचा लोट येईल तेव्हा तुमची पायमल्ली होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तुमचा मृत्यूशी असलेला करारनामा विरवला जाईल आणि अधोलोकाशी तुमचा झालेला करार रद्द केला जाईल. जेव्हा प्रकोपाचा पूर पार केला जाईल, त्या द्वारे तुम्ही झाकले जाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 मृत्यूबरोबर केलेला तुमचा करार रद्द केला जाईल; अधोलोकाशी केलेला तुमचा करार टिकणार नाही. जेव्हा दुःखदायक अरिष्ट झाडून काढते, तेव्हा तुम्हाला त्याच्याकडून तुडविले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 28:18
22 Iomraidhean Croise  

सर्व उंच बुरूज, सर्व मजबूत तट;


तुम्ही म्हणता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाबरोबर संकेत केला आहे; संकटाचा लोट येईल तेव्हा तो आमच्यावर येणार नाही, कारण आम्ही लबाडीचा आश्रय केला आहे व कपटाखाली दडून राहिलो आहोत.”


एफ्राइमातील मद्यप्यांचा दिमाखखोर मुकुट पायांखाली तुडवतील.


आता मी आपल्या द्राक्षीच्या मळ्याचे काय करणार ते तुम्हांला सांगतो : मी त्याचे कुंपण काढून टाकीन म्हणजे तो खाऊन टाकतील; त्याचे आवार मोडीन म्हणजे तो तुडवला जाईल.


प्रभू परमेश्वर म्हणतो : हे सफळ व्हायचे नाही, हे घडायचे नाही.


मसलत करा, पण ती निष्फळ होईल; विचार प्रकट करा, पण तो टिकणार नाही; कारण आमच्यासन्निध देव आहे.1


त्याचा पूर यहूदावर येईल; त्यांना बुडवून तो पुढे वाहील; त्याचे पाणी लोकांच्या गळ्यापर्यंत येईल; हे इम्मानुएला, तो आपले पंख पसरून तुझी सर्व भूमी व्यापून टाकील.”


ह्या स्थळी यहूदा व यरुशलेम ह्यांची मसलत मी निष्फल करीन; त्यांच्या शत्रूंपुढे त्यांचा जीव घेण्यास टपणार्‍यांच्या हाताने, तलवारीने ते पडतील असे मी करीन; त्यांची प्रेते आकाशांतील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य म्हणून देईन.


तू हातांनी आपले कपाळ बडवत त्याच्यापासूनही निघून जाशील; कारण तुझी भिस्त ज्यांच्यावर आहे त्यांना परमेश्वराने धिक्कारले आहे, व त्यांच्यायोगे तुझे कल्याण होणार नाही.


तलवारीपासून निभावलेले असे अगदी थोडे लोक मिसर देशातून यहूदा देशात परत जातील; आणि जे यहूदाचे सर्व अवशिष्ट लोक मिसर देशात काही दिवस राहण्यास गेले आहेत त्यांना, माझा शब्द खरा ठरतो की त्यांचा खरा ठरतो, हे कळून येईल.


“परमेश्वर म्हणतो, पाहा, उत्तरेकडून पाणी चढत आहे, त्याचा मोठा लोंढा बनत आहे; देश व त्यातील सर्वकाही, नगर व त्यातले रहिवासी ह्या सर्वांना तो तुडवील; लोक आक्रोश करतील, देशातले सर्व रहिवासी हायहाय करतील.


आमचे डोळे निरर्थक साहाय्याची वाट पाहून शिणले आहेत; आम्ही वाट पाहत असता, साहाय्य करायला असमर्थ अशा राष्ट्राची वाट पाहिली.


त्या कच्चा चुना लिंपणार्‍यांना म्हण, तट पडेल! जोराचा पाऊस लागेल; अहो मोठ्या गारांनो, तुम्ही पडाल; तुफानी वारा सुटेल;


पण त्याने त्यांच्याविरुद्ध फितुरी करून मिसर देशाने आपणास घोडे व बहुत लोक द्यावेत म्हणून त्याच्याकडे आपले जासूद पाठवले. त्याला यश मिळेल काय? ज्याने अशी गोष्ट केली तो निभावेल काय? त्याने करार मोडला आहे तरी तो निभावेल काय?


अंतसमयी दक्षिणेचा राजा त्याला टक्कर देईल; उत्तरेचा राजा रथ, स्वार व पुष्कळ तारवे घेऊन वावटळीसारखा त्याच्यावर येईल; तो अनेक देशात शिरेल व त्यांना पादाक्रांत करून पार निघून जाईल.


तो महापुराने निनवेच्या स्थानाचा नायनाट करील व तो आपल्या शत्रूंचा पाठलाग करून त्यांना अंधारात उधळून लावील.


असे असता माझे सेवक म्हणजे संदेष्टे ह्यांना जी वचने व नियम मी आज्ञापले होते त्यांनी तुमच्या पूर्वजांना गाठले नाही काय? तेव्हा त्यांनी वळून म्हटले, आमचा आचार व कर्मे ह्यांप्रमाणे आमचे करण्याचा सेनाधीश परमेश्वराचा मानस होता त्याप्रमाणे त्याने आमचे केले आहे.”


मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून तिच्या मागोमाग त्या सर्पाने आपल्या तोंडातून नदीसारखा पाण्याचा प्रवाह सोडला;


आणखी तो मला म्हणाला, “जेथे कलावंतीण बसली आहे, तेथे ‘जे जलप्रवाह’ तू पाहिलेस, ते लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे असे आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan