यशायाह 28:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तुम्ही म्हणता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाबरोबर संकेत केला आहे; संकटाचा लोट येईल तेव्हा तो आमच्यावर येणार नाही, कारण आम्ही लबाडीचा आश्रय केला आहे व कपटाखाली दडून राहिलो आहोत.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तुम्ही म्हटले, “आम्ही मृत्यूबरोबर करारनामा केला आहे. अधोलोकाशी आम्ही करार केला आहे म्हणून आम्हांला शिक्षा होणार नाही, जेव्हा बुडवणारी शिक्षा पार केली जाईल तेव्हा ती आमच्यापर्यंत येऊ शकणार नाही; कारण आम्ही कपटाच्या मागे लपलो आहोत व असत्याला आपले आश्रय केले आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तुम्ही बढाई मारता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाशी आम्ही करार केला आहे. जेव्हा दुःखदायक अरिष्टांचा फटकारा येतो, तो आम्हाला स्पर्श करू शकत नाही, कारण आम्ही खोट्या गोष्टींना आमचे आश्रयस्थान केले आहे आणि असत्यपणाच्या आड स्वतःला लपविले आहे.” Faic an caibideil |
आम्ही पूर्वी जसे केले, म्हणजे आम्ही, आमच्या पूर्वजांनी, आमच्या राजांनी व आमच्या सरदारांनी यहूदाच्या नगरांत व यरुशलेमेच्या आळ्यांत जसे केले त्याप्रमाणे आकाशराणीस धूप जाळण्याविषयी व तिला पेयार्पणे अर्पण करण्याविषयी आमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द आम्ही खरा करून दाखवू; कारण तेव्हा आम्हांला अन्नाची चंगळ असे, आमची आबादानी असे व आम्ही काही अनिष्ट पाहत नसू.