Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 28:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ह्यामुळे त्यांना परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे प्राप्त होईल : नियमावर नियम, नियमावर नियम; कानूवर कानू, कानूवर कानू; थोडे येथे, थोडे तेथे; म्हणजे चालताना ते अडखळून मागे पडतील, भंगतील, पाशात सापडतील, पकडले जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 लोकांस परमेश्वराचे बोलणे परक्या भाषेसारखे अनाकलनीय वाटले. हुकूमावर हुकूम, हुकूमावर हुकूम, नियमावर नियम, नियमावर नियम, थोडे इकडे, थोडे तिकडे, एक धडा तिकडे. लोकांनी स्वत:ला पाहिजे ते केले. म्हणून ते मागे पडून पराभूत झाले, ते सापळ्यात अडकले आणि पकडले गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 म्हणून याहवेहचे वचन त्यांच्याकरिता असे होईल: हे करा, ते करा, यासाठी एक नियम, त्यासाठी एक नियम; थोडेसे इकडे, थोडेसे तिकडे— जेणेकरून ते मागे पडतील; ते जखमी होतील, सापळ्यात अडकतील व पकडले जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 28:13
14 Iomraidhean Croise  

त्यांच्यापुढे मांडलेले ताट त्यांना पाश असे होवो, ते निश्‍चिंत असता त्यांना ते जाळे असे होवो.


कारण नियमावर नियम, नियमावर नियम; कानूवर कानू, कानूवर कानू; थोडे येथे, थोडे तेथे; असे तो बोलत असतो.”


आम्ही आंधळ्यांसारखे भिंत चाचपतो, नेत्रहीनांप्रमाणे चाचपतो; संधिप्रकाशात अडखळावे तसे मध्यान्हसमयी अडखळतो, धष्टपुष्टांमध्ये आम्ही मृतवत आहोत.


म्हणून मी त्यांच्यावर संदेष्ट्याच्या हातून कुर्‍हाड चालवली आहे, माझ्या तोंडच्या शब्दांनी त्यांना ठार केले आहे; माझा न्याय प्रकाशाप्रमाणे व्यक्त झाला आहे.


मी त्याच्यासाठी आपल्या नियमशास्त्राच्या लाखो आज्ञा लिहिल्या, तरी त्याला त्या परक्याच वाटतात.


यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की, ‘तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हांला समजणारच नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हांला दिसणारच नाही;


[जो ह्या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल, परंतु ज्या कोणावर हा पडेल त्याचा हा भुगाभुगा करून टाकील.]”


दावीदही म्हणतो, “त्यांचे मेज त्यांना फास व सापळा, अडखळण व प्रतिफळ असे होवो.


एकाला मृत्यूचा मरणसूचक गंध, आणि एकाला जीवनाचा जीवनसूचक गंध आहोत. हे कार्य करण्यास कोण लायक आहे?


आणि त्याने आपल्या सर्व पत्रांत ह्या गोष्टींचा उल्लेख केला आहे; त्यांत समजण्यास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाही करतात; अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan