Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 27:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्याने जसे दुसर्‍यांना मारले तसे देवाने त्याला मारले काय? जसे मारेकर्‍याने इतरांना मारले तसे त्याला मारण्यात आले काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 काय परमेश्वराने याकोबावर आणि इस्राएलावर हल्ला केला, जसा त्याने त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर हल्ला केला? अथवा यांनी ज्यांचा वध केला आहे त्यांच्या वधाप्रमाणे यांचा वध करण्यात आला आहे काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 याहवेहनी तिच्यावर हल्ला केला आहे का, ज्यांनी तिच्यावर हल्ला केला, तिच्यावर याहवेहने हल्ला केला होता का? तिला मारण्यात आले आहे का, ज्यांनी तिला मारले, त्यांना मारण्यात आले आहे का?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 27:7
17 Iomraidhean Croise  

ह्यास्तव प्रभूने सीयोन डोंगर यरुशलेम ह्यासंबंधाने आपले समग्र कार्य समाप्त केल्यावर असे होईल की अश्शूरचा राजा ह्याच्या मनातील गर्वाचा परिणाम व त्याच्या उन्मत्त दृष्टीचा दिमाख ह्यांचा बदला मी घेईन.


इस्राएलाची ज्योती अग्नी होईल, त्याचा जो पवित्र प्रभू तो ज्वाला होईल; एका दिवसात त्याचे काटेकुटे व काटेझुडपे तो जाळून खाक करील.


संध्याकाळी पाहाल तर थरकाप; पहाट झाली नाही तर तिचा फडशा. जे आम्हांला लुटतात त्यांच्या वाट्याला हे आहे; जे आमचा अपहार करतात त्यांच्या हिश्शाला हे आहे.


एफ्राइमाची तटबंदी, दिमिष्काचे राज्य व अरामाचा अवशेष ही नाहीतशी होतील; इस्राएलाच्या वैभवाची गत झाली तशी त्यांची होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


कारण परमेश्वर आपल्या दंडाने ताडन करील तेव्हा त्याच्या वाणीने अश्शूर भयकंपित होईल;


“अश्शूर तलवारीने पडेल पण मनुष्याच्या नव्हे; मनुष्याची नव्हे अशी तलवार त्याला ग्राशील; तो तलवारीपुढून पळेल; त्याच्या तरुण पुरुषांना वेठीस धरतील.


त्याचे अधिपती भयाने पळून जातील व त्याचे सरदार झेंडा पाहून घाबरतील;” ज्याचा अग्नी सीयोनेत आहे व ज्याची भट्टी यरुशलेमेत आहे, तो परमेश्वर असे म्हणतो.


परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्यांच्या आसपासची नगरे ह्यांचा देवाने समूळ नाश केला, तसाच तेथे कोणी राहणार नाही, एकही मनुष्य तेथे बिर्‍हाड करणार नाही.


बाबेल व खास्दी देशाचे सर्व रहिवासी ह्यांनी तुमच्यादेखत जो सर्व अनर्थ सीयोनेत केला आहे त्यांचे मी उसने फेडीन, असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वराने तुझ्याबद्दल अशी आज्ञा केली आहे की, “तुझ्या बीजाची पुन्हा पेरणी होणार नाही; तुझ्या दैवतांच्या मंदिरातून कोरीव व ओतीव मूर्ती मी नष्ट करीन; मी तुझी कबर तयार करीन, कारण तू हलका ठरला आहेस.”


तुझी जखम भरत नाही; तुझा घाय असाध्य आहे; तुझी बातमी ऐकणारे सर्व तुझ्याविषयी टाळ्या पिटतात; कारण ज्याला तुझी दुष्टता सतत जाचली नाही असा कोण आहे?


Lean sinn:

Sanasan


Sanasan