यशायाह 27:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्याच्या डाहळ्या वाळल्या म्हणजे त्या तोडून टाकतील, स्त्रिया येऊन त्या जाळतील; ते लोक ज्ञानशून्य आहेत म्हणून त्यांच्या उत्पन्नकर्त्याला त्यांचा कळवळा येत नाही, त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्याच्या फांद्या सुकतील तेव्हा त्या तोडल्या जातील, स्त्रिया त्या सरपणासाठी वापरतील. कारण हे लोक समजदार नाहीत. म्हणून त्यांना घडविणारा देव ह्यास्तव यांच्यावर दया करणार नाही, आणि त्यांचा निर्माणकरता यांच्यावर कृपा दाखवणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जेव्हा झाडाच्या फांद्या वाळून शुष्क होतात व मोडतात आणि स्त्रिया येतात व ते सरपण म्हणून जाळतात. तसे हे लोक असमंजस आहेत; म्हणून त्यांना घडविणाऱ्याला त्यांची दया येत नाही आणि त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही. Faic an caibideil |