Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 27:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तटबंदीचे शहर उजाड आहे; ते रानासारखे सोडून दिलेले व टाकलेले वसतिस्थान झाले आहे; तेथे वासरे चरतात, बसतात व तेथल्या फांद्या खाऊन टाकतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 कारण तटबंदी असलेले शहर नाश झाले आहे आणि वस्ती असलेले राणासारखी सोडून दिलेली आहे. वासरू तेथे चरेल आणि तेथे बसेल आणि त्याच्या फांद्या खाऊन टाकेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तटबंदीचे शहर उजाड झाले आहे, टाकून दिलेले आवास, टाकून दिलेल्या अरण्यासारखी आहे; तिथे वासरे चरतात, तिथे ती झोपतात, ते त्याच्या फांद्या खाऊन निष्पर्ण करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 27:10
24 Iomraidhean Croise  

अरोएराची नगरे लोक सोडून गेले आहेत; ती गुरांच्या कळपांची ठिकाणे झाली आहेत. ते तेथे बसतात; त्यांना घाबरवणारा कोणी नाही.


त्या दिवशी इस्राएलाच्या भीतीस्तव सोडून दिलेल्या व उद्ध्वस्त झालेल्या वनातील आणि डोंगराच्या माथ्यावरील स्थलांप्रमाणे त्याची तटबंदीची नगरे होतील; ती उजाड होतील.


व्यवस्थाभ्रष्ट नगर भंग पावले आहे; प्रत्येक घर बंद पडले आहे, कोणाचाही आत रिघाव होत नाही.


तू शहराला मोडतोडीचा ढीग बनवले आहेस; तटबंदीचा गाव धुळीस मिळवला आहेस; विदेशीयांच्या महालांनी भरलेले शहर नष्ट केले आहेस; त्याचा कधी जीर्णोद्धार होणार नाही.


पण वनाचा नाश होतेवेळी गारा पडतील व शहर निखालस जमीनदोस्त करण्यात येईल.


अरण्य व रुक्ष भूमी ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल.


तेव्हा तू आपल्या मनात म्हणशील, ‘माझी मुले तर हिरावून नेली आहेत, मी वांझ आहे, मी स्वदेशाला मुकले आहे, व परागंदा झाले आहे, अशा माझ्यासाठी ह्यांना जन्म कोणी दिला? ह्यांना लहानाचे मोठे कोणी केले? पाहा, मी एकटीच उरले होते; ही कोठे होती?”’


तुझी पवित्र नगरे वने बनली आहेत; सीयोन रान बनली आहे; यरुशलेम ओसाड झाली आहे.


त्या दिवशी असे होईल की एकेक मनुष्य एकेक कालवड व दोन-दोन मेंढ्या पाळील;


ज्या टेकड्यांवर कुदळींनी खणीत त्या सगळ्यांवर काटेर्‍यांच्या भीतीने तू जाणार नाहीस, तर त्या ठिकाणी गुरेढोरे चरतील व शेरडेमेंढरे फिरतील.”


परमेश्वराच्या संतप्त क्रोधामुळे शांतिमय कुरणे सामसूम झाली आहेत.


“यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या दिवसांत मीखा1 मोरष्टकर ह्याने संदेश दिला; तो यहूदाच्या सर्व लोकांना म्हणाला, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम ढिगार होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.’


तर मी हे मंदिर शिलोसारखे करीन, आणि हे नगर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना शापमूलक करीन.”’


बाबेलच्या राजाने त्यांना हमाथ देशातील रिब्ला येथे मार देऊन ठार केले. ह्या प्रकारे यहूदी लोकांना त्यांच्या देशातून कैद करून नेले.


पर्वणीस जाणारे कोणी नाहीत म्हणून सीयोनेचे मार्ग शोक करीत आहेत; तिच्या सर्व वेशी उजाड झाल्या आहेत; तिचे याजक उसासे टाकत आहेत; तिच्या कुमारी खिन्न झाल्या आहेत; ती स्वतः कष्टी आहे.


सीयोन पर्वत उजाड झाल्यामुळे त्यांतून कोल्हे फिरत असतात.


ह्यास्तव इस्राएलाच्या पर्वतांनो, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका; आसपासच्या राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेल्या लोकांना लूट व निंदेचा विषय झालेले पर्वत व टेकड्या, नाले व खोरी, उजाड व ओसाड नगरे ह्यांना प्रभू परमेश्वर असे म्हणतो की,


म्हणून तुमच्यामुळे सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan