Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 26:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 रात्री माझ्या जिवास तुझी उत्कंठा लागली; मी अगदी अंत:करणपूर्वक तुझा शोध करीन; कारण तुझी न्यायकृत्ये पृथ्वीवर होतात तेव्हा जगात राहणारे नीतिमत्ता शिकतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 प्रत्येक रात्रीबरोबर तुझ्याशी एकरूप होण्याची आमची इच्छा आहे, माझा आत्मा माझ्यामध्ये आतुरतेने तुला शोधीन, कारण जेव्हा तुझा न्याय या पृथ्वीवर येतो, तेव्हा या जगातील राहणारे न्यायीपण शिकतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 रात्री माझ्या जीवाला तुमचा ध्यास लागतो; सकाळी माझा आत्मा तुमच्यासाठी आसुसलेला असतो. जेव्हा तुमचे न्याय पृथ्वीवर येतात, तेव्हा जगातील लोक धार्मिकता शिकतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 26:9
28 Iomraidhean Croise  

तो परमेश्वर आमचा देव आहे; त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीवर आहेत.


तो परमेश्वर आमचा देव आहे; त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीभर आहेत.


हे परमेश्वरा, मी रात्री तुझ्या नावाचे स्मरण केले आहे. आणि तुझे नियमशास्त्र पाळले आहे.


तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुझे उपकारस्मरण करण्यास मी मध्यरात्री उठतो.


पहाटेची वाट पाहणार्‍या पहारेकर्‍यांपेक्षा, पहाटेची वाट पाहणार्‍या पहारेकर्‍यांपेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.


तेव्हा माणसे म्हणतील की, “नीतिमानास खचीत फलप्राप्ती होते, खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे.”


हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे.


मज्जेने व मेदाने व्हावा तसा माझा जीव तृप्त होईल; आणि माझे मुख हर्षभरित होऊन तुझे स्तवन करील.


तेव्हा मानवजातीस धाक बसेल; ते देवाची कृती वाखाणतील व त्याच्या कृतीचा नीट विचार करतील.


तो त्यांचा वध करू लागला तेव्हा ते त्याचा शोध करू लागले; ते देवाकडे वळून अनन्यभावे त्याला शरण गेले.


म्हणजे तू, केवळ तूच, परमेश्वर3 ह्या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळू दे.


माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते; जे मला परिश्रमाने शोधतात त्यांना मी सापडते.


अशा रीतीने याकोबाच्या दोषांचे क्षालन होईल; त्याचे पाप दूर केल्याचे फळ हेच आहे; तो वेद्यांचे सर्व चिरे फुटलेल्या चुनखड्यासारखे करील तेव्हा अशेरामूर्ती व सूर्यमूर्ती पुन्हा उभारणार नाहीत.


परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या सेवकाचे ऐकणारा असा तुमच्यामध्ये कोण आहे? जो अंधारात चालतो, ज्याला प्रकाश मिळत नाही त्याने परमेश्वराच्या नामावर भाव ठेवावा, आपल्या देवाचा आश्रय करावा.


परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा;


ऊठ, रात्रीच्या प्रहरारंभी विलाप कर; प्रभूसमोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत; तुझी बालके हरएक गल्लीच्या चवाठ्यावर भुकेने व्याकूळ झाली आहेत, त्यांच्या प्राणरक्षणासाठी त्याच्याकडे हात पसर.


जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांना, जो जीव त्याला शरण जातो त्याला, परमेश्वर प्रसन्न होतो.


मी क्रोधाने, संतापाने व तीव्र निषेधवाणीने तुझे न्यायशासन करीन. तेव्हा तुझ्याभोवतालच्या राष्ट्रांना तू अपशब्द, निंदा, ताकीद व विस्मय ह्यांचा विषय होशील; मी परमेश्वर हे म्हणालो आहे;


ते आपल्या दोषाचे फळ भोगून माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होईपर्यंत मी आपल्या स्थानी जाऊन राहीन; ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील :


तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील.


मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.


त्या दिवसांत असे झाले की, एकदा तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला.


त्याच घटकेस ‘मोठा भूमिकंप’ झाला. तेव्हा त्या नगराचा दहावा भाग ‘पडला,’ भूमिकंपाने सात हजार माणसे ठार झाली आणि बाकीची भयभीत होऊन त्यांनी ‘स्वर्गीय देवाचा’ गौरव केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan