Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 26:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीवरील रहिवाशांना त्यांच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानाहून निघाला आहे. शोषलेले रक्त पृथ्वी प्रकट करील, वधलेल्यांना ती ह्यापुढे झाकून ठेवणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीतल्या राहणाऱ्यांच्या अन्यायाबद्दल शिक्षा करण्यास आपले स्थान सोडून येत आहे. मारल्या गेलेल्यांचे रक्त पृथ्वी प्रगट करेल, आणि आपल्या वधलेल्यांना यापुढे झाकून ठेवणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 पाहा, पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा देण्याकरिता, याहवेह त्यांच्या निवासस्थानातून बाहेर येत आहेत तिच्यावर झालेला रक्तपात पृथ्वी प्रगट करेल; तिच्यावर वधलेले यापुढे पृथ्वी लपवून ठेवणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 26:21
28 Iomraidhean Croise  

अगे पृथ्वी, माझे रक्त झाकून ठेवू नकोस; माझ्या आरोळीस कोठेही खंड न पडो.


आकाश त्याचा अधर्म प्रकट करील; पृथ्वी त्याच्याविरुद्ध उठेल.


पारिपत्याच्या दिवशी व दुरून नाशकारक वादळ येईल तेव्हा काय कराल? तुम्ही साहाय्यार्थ कोणाकडे धाव घ्याल? आपले ऐश्वर्य कोठे ठेवून जाल?


मी जगाचे त्याच्या दुष्टतेबद्दल व पातक्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल पारिपत्य करीन; गर्विष्ठांचा दिमाख बंद करीन, जुलम्यांचा तोरा उतरवीन.


परमेश्वराने मला सांगितले की : “सूर्य प्रकाशत असता स्वच्छ ऊन पडते व कापणीच्या समयी उष्णकाळी दहिवरयुक्त अभ्र येते, तसा मी शांत राहून आपल्या निवासस्थानातून अवलोकन करीन.”


सेनाधीश परमेश्वराने माझ्या कानात सांगितले आहे की, “तुम्ही मरावे ह्याशिवाय ह्या अन्यायाचे दुसरे प्रायश्‍चित्त खरोखर नाही,” असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


मेघगर्जना, भूमिकंप, महानाद, वावटळ, तुफान व ग्रासणारी अग्निज्वाला ह्यांनी सेनाधीश परमेश्वर तुझा समाचार घेईल.


पाहा, माझ्यासमोर हा लेख आहे; मी पारिपत्य करीपर्यंत उगा राहणार नाही, प्रतिफळ त्यांच्या पदरी मोजून घालीन;


तुमच्या दुष्कर्मांचे आणि तुमच्या वाडवडिलांनी पर्वतावर धूप जाळला व टेकड्यांवर माझा अपमान केला त्या दुष्कर्मांचे फळ मी त्यांना देईन,” असे परमेश्वर म्हणतो; “मी आधी त्यांच्या कर्मांचे फळ त्यांच्या पदरी मोजून घालीन.”


नगरातून कोलाहल ऐकू येतो; मंदिरातून शब्द ऐकू येतो; आपल्या शत्रूंचे पारिपत्य करणार्‍या परमेश्वराचा शब्द ऐकू येतो;


तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ते काय करीत आहेत ते पाहतोस ना? मी आपल्या पवित्रस्थानातून दूर निघून जावे म्हणून अशी अमंगळ कृत्ये इस्राएल घराणे येथे करीत आहे; ह्याहूनही अधिक अमंगळ कृत्ये तुझ्या दृष्टीस पडतील.”


अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बहिर्भाग केला, त्याने अंतर्भागही केला नाही काय?


ह्यासाठी की, जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्ट्यांचे रक्त,


कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले’ आणि तू ‘त्यांना रक्त पिण्यास’ लावले आहे; ह्यास ते पात्र आहेत.”


तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व ‘पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे’ रक्त सापडले.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan