Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 26:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 आम्ही गरोदर होतो, आम्ही वेणा दिल्या, पण आम्ही जसे काय वारा प्रसवलो; आम्ही देशाचा काही उद्धार केला नाही; देशात वस्ती करण्यास कोणी जन्म पावले नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 त्याचप्रमाणे आम्ही गरोदर होतो, आम्ही प्रसूतीवेदनेमध्ये होतो, पण आम्ही फक्त वाऱ्याला जन्म दिला. पृथ्वीत आम्ही काही तारण केले नाही, आणि जगातील राहणारे पडले नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 आम्ही गरोदर होतो, प्रसूतीच्या वेदनांनी लोळलो, परंतु आम्ही वार्‍याला जन्म दिला. आम्ही देशात तारण आणलेले नाही, आणि जगातील लोक जीवनाकडे आले नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 26:18
12 Iomraidhean Croise  

ते जाऊन त्याला म्हणाले, “हिज्कीया असे म्हणतो की आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमान ह्यांचा आहे, कारण मुले जन्मायला आली पण प्रसवण्याची शक्ती नाही.


हे परमेश्वरा, आपले वतन इहलोकीच आहे असे ज्यांना वाटते, ज्यांचे पोट तू आपल्या भांडारातून भरतोस, अशा मानवांपासून ऐहिक मानवांपासून, आपल्या हाताने माझा जीव सोडव; ते आपल्या संततीतच तृप्त असोत, आणि आपण साठवलेले धन आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवोत;


तुम्ही भुसाचा गर्भ धराल व धसकट प्रसवाल; तुमचा श्वास हाच अग्नी आहे, तो तुम्हांला ग्राशील.


ते त्याला म्हणाले, “हिज्कीया असे म्हणतो की, ‘आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमान ह्यांचा आहे, कारण मुले जन्मायला आली पण प्रसवण्याची शक्ती नाही.


न्यायाला अनुसरून दावा करणारा कोणी नाही, आणि सत्यास स्मरून खटला चालवणारा कोणी नाही; लोक पोकळ गोष्टींवर भिस्त ठेवतात, कपटाने बोलतात; ते उपद्रवरूप गर्भ धारण करतात आणि अनर्थाला जन्म देतात.


प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदना त्याला लागतील; तो अक्कलशून्य मुलगा आहे, कारण तो गर्भाशयाच्या द्वारानजीक योग्य वेळी येत नाही.


जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण त्याची कृत्ये वाईट आहेत अशी मी त्याच्याविषयी साक्ष देतो.


आपण देवापासून आहोत हे आपल्याला ठाऊक आहे; सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.


शौल म्हणाला, “आज कोणाही मनुष्याचा वध करायचा नाही; कारण आज परमेश्वराने इस्राएलाचा उद्धार केला आहे.”


तेव्हा लोक शौलाला म्हणाले, “ज्याने इस्राएलाचा एवढा उद्धार केला तो योनाथान मरणार काय? असे कदापि होणे नाही; परमेश्वराच्या जीविताची शपथ, त्याच्या डोक्यावरचा एक केसही भूमीवर पडता कामा नये, कारण त्याने आज परमेश्वराच्या पक्षाने कामगिरी केली आहे.” ह्या प्रकारे लोकांनी योनाथानाचा बचाव केला, तो मेला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan