Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 26:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 हे परमेश्वरा, संकटाच्या वेळी त्यांनी तुझ्याकडे दृष्टी फिरवली; त्यांना तुझ्याकडून शिक्षा झाली तेव्हा त्यांनी मंद स्वराने आपले हृद्‍गत तुला कळवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 परमेश्वरा, संकटात असताना ते तुझे स्मरण करतात. तुझी शिक्षा त्यांच्यावर असता त्यांनी तुझ्यापुढे प्रार्थना केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 हे याहवेह, ते त्यांच्या संकटात असताना तुमच्याकडे आले; जेव्हा तुम्ही त्यांना शिस्त लावली, तेव्हा ते कुजबुजत थोडीफार प्रार्थना करू शकत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 26:16
23 Iomraidhean Croise  

मी त्याच्यापुढे आपले गार्‍हाणे मांडतो; मी आपले संकट त्याला सांगतो.


“माझे दर्शन घ्या,” असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, “हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे.”


लोकसमुदाय सण पाळीत असे तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले; आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्यांना मी कसा मिरवत नेई, हे आठवून माझ्या जिवाचे पाणी पाणी होते.


आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


मी देवाचे स्मरण करून व्याकूळ होतो; मी ध्यान करू इच्छितो पण माझा जीव मूर्च्छित होतो. (सेला)


तो त्यांचा वध करू लागला तेव्हा ते त्याचा शोध करू लागले; ते देवाकडे वळून अनन्यभावे त्याला शरण गेले.


तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन;


ते त्याला म्हणाले, “हिज्कीया असे म्हणतो की, ‘आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमान ह्यांचा आहे, कारण मुले जन्मायला आली पण प्रसवण्याची शक्ती नाही.


ते काष्ठास म्हणतात, ‘तू माझा बाप;’ पाषाणास म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास;’ त्यांनी माझ्याकडे मुख नव्हे तर पाठ फिरवली; तरी संकटसमयी ते म्हणतील, ‘ऊठ; आमचा बचाव कर.’


अगे लबानोनवासिनी, गंधसरूंवर घरटे करणारे, तुला तिडका येतील; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे तू वेणा देशील तेव्हा तू कशी धापा टाकशील!”


तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन.


ऊठ, रात्रीच्या प्रहरारंभी विलाप कर; प्रभूसमोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत; तुझी बालके हरएक गल्लीच्या चवाठ्यावर भुकेने व्याकूळ झाली आहेत, त्यांच्या प्राणरक्षणासाठी त्याच्याकडे हात पसर.


ते आपल्या दोषाचे फळ भोगून माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होईपर्यंत मी आपल्या स्थानी जाऊन राहीन; ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील :


त्यांनी कधी मनापासून माझा धावा केला नाही; ते आपल्या बिछान्यांवर पडून धान्य व द्राक्षारस ह्यांसाठी ओरडतात; ते जमा होऊन माझ्याविरुद्ध बंड करतात.


हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, “परमेश्वराविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे; तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली.


‘जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो;’ म्हणून आस्था बाळग आणि पश्‍चात्ताप कर.


तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराला म्हणाले, “आम्ही पाप केले आहे; तुला बरे दिसेल तसे कर, मात्र आज आमचा बचाव कर, एवढीच आमची विनवणी आहे.”


हन्ना त्याला म्हणाली, “माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे; मी द्राक्षारसाचे किंवा मद्याचे सेवन केलेले नाही, मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan