Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 26:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तू राष्ट्रांची वाढ केली आहेस, हे परमेश्वरा, तू राष्ट्रांची वाढ केली आहेस; तू आपला महिमा दाखवला आहेस; तू देशाच्या चतुःसीमा वाढवल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 हे परमेश्वरा, तू राष्ट्र वाढवले आहेस, तू राष्ट्र वाढवले आहे, तू सन्मानीत आहेस, तू भूमीच्या सर्व सीमा विस्तारित केल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 याहवेह, तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे; तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे. तुम्ही स्वतःसाठी गौरव प्राप्त केले आहे; तुम्ही देशाच्या सर्व सीमा वाढविल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 26:15
33 Iomraidhean Croise  

मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील;


मी तुझी संतती पृथ्वीच्या रज:कणांसारखी करीन; कोणाला पृथ्वीच्या रज:कणांची गणना करता आली तर तुझ्या संततीचीही गणना होईल.


त्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केले, (कारण पाप करत नाही असा कोणीच नाही) व तू त्यामुळे क्रोधाविष्ट होऊन त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले आणि त्यांनी त्यांना जवळच्या अथवा दूरच्या देशात पाडाव करून नेले,


शेवटी परमेश्वराने आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांच्या द्वारे सांगितल्याप्रमाणे इस्राएलास आपल्या दृष्टिआड केले. त्यांना स्वदेशातून काढून अश्शूरास नेण्यात आले; तेथेच ते आजवर राहत आहेत.


होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूराच्या राजाने शोमरोन सर केले व इस्राएल लोकांना अश्शूर देशात नेऊन हलह व हाबोर येथे व गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरांतून वसवले.


परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलास जसे आपल्या नजरेपुढून दूर केले तसेच यहूदासही दूर करीन; हे यरुशलेम नगर मी निवडले होते व ह्या मंदिरात माझ्या नावाचा निवास होईल असे मी म्हणालो होतो, त्याचाही मी त्याग करीन.”


तू त्यांचे वंशज आकाशातील तार्‍यांप्रमाणे बहुगुणित केले आणि ज्या देशात जाऊन तुम्ही त्यांचे वतन पावाल म्हणून तू त्यांच्या पूर्वजांना सांगितले होते, त्या देशात तू त्यांना नेऊन पोचवले.


तो राष्ट्रांची समृद्धी करून मग त्यांचा विध्वंस करतो; तो राष्ट्रांचा विस्तार करून मग त्यांचा संकोच करतो.


कारण हे इस्राएला, तुझे लोक समुद्राच्या रेतीइतके असले तरी त्यांचा अवशेष मात्र परत येईल; न्यायाने परिपूर्ण असा प्रलय नेमला आहे.


तुझे नेत्र राजाला वैभवसंपन्न असा पाहतील. ते दूरवर विस्तृत झालेली भूमी पाहतील.


म्हणजे परमेश्वराचे गौरव प्रकट होईल आणि सर्व मानवजाती एकत्र मिळून ते पाहील, कारण हे बोलणे परमेश्वराच्या तोंडचे आहे.”


हे आकाशा, जयघोष कर, कारण परमेश्वराने हे केले आहे; अहो पृथ्वीच्या अधोभागांनो, हर्षनाद करा; अहो पर्वतांनो, हे वना, त्यातील प्रत्येक वृक्षा, तुम्ही जयजयकार करा; कारण परमेश्वराने याकोबाला उद्धरले आहे; तो इस्राएलाच्या ठायी आपला प्रताप प्रकट करतो.


परमेश्वर लोकांना दूर घालवून देईल व देशात ओसाड स्थळे बहुत होतील तोवर.


तुझे सर्व लोक नीतिमान होतील, ते भूमीचे वतन सर्वकाळ भोगतील; माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लावलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील,


तू राष्ट्राची वृद्धी केली आहेस; त्याला महानंदप्राप्ती करून दिली आहेस, हंगामाच्या उत्सवसमयी करायच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणार्‍या लोकांच्या आनंदाप्रमाणे, ते तुझ्यासमोर आनंद करतात.


त्यांमधून उपकारस्मरणाचा व आनंदोत्सव करणार्‍यांचा शब्द उठेल; मी त्यांची संख्या वाढवीन. ती अल्प होणार नाही; मी त्यांचे गौरव करीन म्हणजे ते क्षुद्र असणार नाहीत.


पाहा, मी आपल्या क्रोधाने, संतापाने व महारोषाने त्यांना ज्या ज्या देशांत हाकून दिले आहे त्यांतून त्यांना एकत्र करीन; मी ह्या स्थली त्यांना परत आणीन व सुरक्षित बसवीन.


कारण मी तुम्हांला राष्ट्रांतून काढून आणीन, सर्व देशांतून मी तुम्हांला जमा करून तुमच्या देशात आणीन.


तुझ्या वस्तीचा तिसरा हिस्सा पटकीने मरेल व तुझ्यामध्ये लोक उपासमारीने नाश पावतील; तिसरा हिस्सा तुझ्याभोवती तलवारीने पडेल; व तिसरा हिस्सा मी सर्व दिशांना विखरीन; मी तलवारीने त्यांची पाठ पुरवीन.


याकोबाचे रजःकण कोण मोजू शकेल? इस्राएलाच्या चौथ्या भागाची1 तरी गणती कोण करू शकेल? नीतिमानाप्रमाणे मला मृत्यू येवो! माझा अंत त्याच्यासारखा होवो!”


ते तलवारीच्या धारेने पडतील, त्यांना बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील, आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत ‘परराष्ट्रीय यरुशलेमेस पायांखाली तुडवतील.’


तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.


ह्या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, “हे माझ्या पित्या, वेळ आली आहे; पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू आपल्या पुत्राचा गौरव कर;


तुझे पूर्वज मिसर देशात गेले तेव्हा ते सत्तर जण होते; पण आता तुझा देव परमेश्वर ह्याने तुझी संख्या आकाशातील तार्‍यांप्रमाणे बहुगुणित केली आहे.


तू तुझ्या शत्रूंपुढे मार खाशील असे परमेश्वर करील; तू एका वाटेने त्यांच्यावर चालून जाशील पण त्यांच्यापुढून सात वाटांनी पळून जाशील, आणि पृथ्वीवरील सर्व राज्यांना नकोसा होशील.


पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत, सर्व राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुमची पांगापांग करील, आणि तेथे तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना अपरिचित अशा काष्ठपाषाणमय म्हणजे अन्य देवांची सेवा तुम्ही कराल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan