Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 26:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मृत जिवंत होत नसतात, प्रेते उठत नसतात; तद्वत तू त्यांची झडती घेऊन त्यांचा विध्वंस केला आहेस व त्यांचे स्मरण अगदी नाहीसे केले आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 ते मृत आहेत, ते जिवंत नाहीत; ते प्रेते आहेत, ते उठणार नाहीत. खरोखर, तू त्यांना दंड देऊन त्यांचा नाश केला आहेस आणि त्यांची आठवण तू नष्ट केली आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 ते आता मरण पावले आहेत, ते आता जगणार नाहीत. त्यांचे मृतात्मे उठत नाहीत. तुम्ही त्यांना शिक्षा केली आणि त्यांचा नाश केला; तुम्ही त्यांच्या सर्व आठवणी पुसून टाकल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 26:14
25 Iomraidhean Croise  

देशातून त्याची आठवण बुजेल, व पेठेत त्याचे नाव राहणार नाही.


त्याच्या मातेचे उदर त्याला विसरेल. कीटक त्याच्यावर चंगळ करतील; त्याचे कोणाला स्मरण उरणार नाही; असा दुष्टांचा वृक्षाप्रमाणे निःपात होईल.


मेघ ज्याप्रमाणे वितळून नाहीसा होतो, तसा अधोलोकात जाणारा परत वर येत नाही,


ते पौर येथील बआल ह्या दैवतावर आसक्त झाले; त्यांनी निर्जीव मूर्तींना वाहिलेले बळी खाल्ले.


त्याच्या वंशाचा उच्छेद होवो; भावी पिढीत त्याचा नामनिर्देश न होवो.


त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही; आणि त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही.


पाहा, दुष्कर्म करणारे तेथे पडले आहेत! त्यांना लोटून दिले आहे, त्यांच्याने उठवणार नाही.


हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, इस्राएलाच्या देवा, तू सर्व राष्ट्रांची झडती घेण्यास जागृत हो; कोणाही दगेखोर दुष्टावर दया करू नकोस. (सेला)


वैर्‍यांचा समूळ नाश झाला आहे, त्यांचा कायमचा नायनाट झाला आहे; जी शहरे तू उजाड केली त्यांची आठवणदेखील नाहीशी झाली आहे.


अशा प्रकारे परमेश्वराने त्या दिवशी मिसर्‍यांच्या हातातून इस्राएल लोकांना तारले आणि मिसरी लोक समुद्रतीरी मरून पडलेले इस्राएलांनी पाहिले.


नीतिमानांच्या स्मरणाने धन्यता वाटते; दुर्जनांचे नाव वाईट होऊन जाते.


आपल्याला मरायचे आहे हे जिवंतांना निदान कळत असते; पण मेलेल्यांना तर काहीच कळत नाही; त्यांना आणखी काही फलप्राप्ती होणार नसते; त्यांचे स्मरण कोणाला राहत नाही.


पारिपत्याच्या दिवशी व दुरून नाशकारक वादळ येईल तेव्हा काय कराल? तुम्ही साहाय्यार्थ कोणाकडे धाव घ्याल? आपले ऐश्वर्य कोठे ठेवून जाल?


तुझे मृत जिवंत होतील, माझ्या (लोकांची) प्रेते उठतील. मातीस मिळालेल्यांनो जागृत व्हा, गजर करा; कारण तुझ्यावरील दहिवर, हे प्रभातीचे जीवनदायी दहिवर आहे; भूमी प्रेते बाहेर टाकील.


मेघगर्जना, भूमिकंप, महानाद, वावटळ, तुफान व ग्रासणारी अग्निज्वाला ह्यांनी सेनाधीश परमेश्वर तुझा समाचार घेईल.


त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत; कारण ते देव नव्हते, ते मनुष्यांच्या हातांनी घडलेले काष्ठपाषाण होते; म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला.


ते तुम्हांला म्हणतील, “भूतवैद्यांना व छांछू करणार्‍या मांत्रिकांना विचारायला जा;” तेव्हा म्हणा, लोकांनी आपल्या देवाला विचारू नये काय? जिवंतांसाठी मेलेल्यांना विचारावे काय?


“ऊठ, बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएलाच्या देशास जा, कारण बालकाचा जीव घेण्यास जे पाहत होते ते मरून गेले आहेत.”


तेथे तुम्ही मनुष्यांच्या हातांनी घडलेले काष्ठ-पाषाणादिकांचे देव, जे पाहत नाहीत, ऐकत नाहीत, खात नाहीत व हुंगत नाहीत अशांची सेवा कराल.


मृतांपैकी बाकीचे लोक, ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. हेच पहिले पुनरुत्थान.


Lean sinn:

Sanasan


Sanasan