Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 25:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 सेनाधीश परमेश्वर ह्या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करत आहे; उत्कृष्ट मिष्टान्नाची व राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तेव्हा या सीयोन डोंगरावर म्हणजेच येरुशलेमेत सेनाधीश परमेश्वर आपल्या लोकांस मेजवानी तेथे उत्तमोत्तम चवदार पदार्थ असतील मांसाचे मज्ज सहीत तुकडे असतील, तसेच चवदार द्राक्षमध देण्यात येईल ते सर्व खाऊन पिऊन तृप्त होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 या डोंगरावर सर्वशक्तिमान याहवेह सर्व लोकांसाठी उत्तम अन्नाच्या मेजवानीची तयारी करतील, जुन्या द्राक्षारसाची मेजवानी— सर्वोत्तम मांस आणि सर्वोत्कृष्ट द्राक्षारस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 25:6
30 Iomraidhean Croise  

तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल, आणि तू आपल्या सुखांच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील.


मज्जेने व मेदाने व्हावा तसा माझा जीव तृप्त होईल; आणि माझे मुख हर्षभरित होऊन तुझे स्तवन करील.


तर यहूदाचा वंश त्याने पसंत केला; आपणाला प्रिय जो सीयोन डोंगर तो त्याने पसंत केला.


तो मला मुखचुंबन देवो; तुझे प्रेम द्राक्षारसाहून मधुर आहे.


माझ्या चित्ताचे आकर्षण कर, म्हणजे आम्ही तुझ्यामागून धावत येऊ. राजाने मला अंत:पुरी आणले आहे. आम्ही तुझ्या ठायी आनंदोत्सव करू; तुझे प्रेम द्राक्षारसाहून अधिक वर्णू; त्या एकनिष्ठपणे तुझ्यावर प्रीती करीत आहेत.


हे माझे भगिनी, माझे वधू, मी आपल्या बागेत आलो आहे; मी आपला गंधरस व सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत; मी आपले मधूने थबथबलेले पोळे खाल्ले आहे; मी दुग्ध व द्राक्षारस ही सेवन केली आहेत; मित्रहो, खा; प्रियजनहो, प्या, मनमुराद प्या.


तुम्ही माझे ऐकायला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल;


परमेश्वराचा हात ह्या डोंगरावर राहील, व जसे शेणाच्या खाईतील रेंद्यात गवत तुडवतात तसे मवाबास जागच्या जागी तुडवतील.


त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थनामंदिरात त्यांना हर्षित करीन; माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम व यज्ञ मला पसंत होतील; कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनामंदिर आहे असे म्हणतील.


मवाब लहानपणापासून सुखात आहे. स्थिर राहिल्यामुळे गाळ खाली बसलेल्या द्राक्षारसासारखा तो आहे; त्याला ह्या पात्रातून त्या पात्रात ओतले नाही, तो बंदिवान होऊन गेला नाही, म्हणून त्याची रुची तशीच कायम आहे; त्याच्या वासात काही फरक झालेला नाही.


सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, ह्यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली; त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे; त्याचे राज्य अविनाशी आहे.


परमेश्वर असे म्हणतो, मी सीयोनेस परत आलो आहे, मी यरुशलेमेत वस्ती करणार; यरुशलेमेस ‘सत्यनगर’ म्हणतील व सेनाधीश परमेश्वराच्या पर्वतास ‘पवित्र गिरी’ म्हणतील.


मी तुम्हांला सांगतो की, मी आपल्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षारस पिईपर्यंत येथून पुढे द्राक्षाचा हा उपज पिणारच नाही.”


मी तुम्हांला सांगतो की, ‘पूर्वेकडून व पश्‍चिमेकडून’ पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील;


मग त्याने त्यांना सांगितले की, “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.


ह्यासाठी की, तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे, आणि राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्याय करावा.”


जुना द्राक्षारस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो.”


पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत,


तेव्हा तो मला म्हणाला, “हे लिही की, कोकर्‍याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य.” तो मला असेही म्हणाला, “ही देवाची सत्यवचने आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan