Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 25:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 कारण निर्दय लोकांचा झपाटा भिंतीवर आदळणार्‍या वादळाप्रमाणे आहे; पण तू दुर्बलास दुर्ग, लाचारास विपत्काली आश्रय, वादळात निवारा, उन्हात सावली, असा झालास.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कारण तू गोरगरीबांचा रक्षणकर्ता आहेस, गरजूंना त्यांच्या दुःखाच्या समयी तू संरक्षक असा आहेस. जेव्हा निर्दयींचा फटका भींतीला लागणाऱ्या वादळासारखा असतो, तेव्हा तू उन्हाच्या तापात त्यांची सावली व सकंटाच्या वादळात त्यांचा निवारा असा आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तुम्ही गरिबांसाठी आश्रयस्थान असे आहात, गरजवंतासाठी त्यांच्या संकटातील आश्रयस्थान आहात, वादळामध्ये निवारा आहात आणि उष्णतेमध्ये सावली आहात. कारण निर्दयी लोकांचा श्वास हा भिंतीवर चालून येणाऱ्या वादळासारखा आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 25:4
37 Iomraidhean Croise  

पण दरिद्र्यांस क्लेशांतून मुक्त करून तो उच्च स्थानी ठेवतो, त्यांची कुटुंबे कळपासारखी वाढवतो.


मी तुझे निर्बंध धरून राहिलो आहे; हे परमेश्वरा, मला फजीत होऊ देऊ नकोस.


परमेश्वर म्हणतो, “दीनांवरील जुलमामुळे व कंगालांच्या उसाशामुळे मी आता उठलो आहे, ज्या आश्रयाचा सोस त्याला लागला आहे, त्यात मी त्याला सुरक्षित ठेवीन.”


परमेश्वर तुझा रक्षक आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे.


माझी सर्व हाडे म्हणतील, “हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? तू दीनास त्याच्याहून बलिष्ठ असणार्‍यापासून सोडवतोस; तू दीनास व कंगालास त्याला लुटणार्‍यापासून सोडवतोस;”


प्रचंड वायू व वादळ ह्यांच्यापासून आसरा मिळवण्याची मी त्वरा केली असती!”


दुबळा व दरिद्री ह्यांच्यावर तो दया करील, दरिद्र्यांचे जीव तो तारील.


तो प्रजेतल्या दीनांचा न्याय करो. तो दरिद्र्यांच्या मुलाबाळांचे तारण करो, तो जुलूम करणार्‍यांना चिरडून टाको.


ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण, हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकले नाहीस.


जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.


तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील, आणि पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील; तो आपल्या मुखरूप वेत्राने पृथ्वीला ताडन करील, आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार थकरील.


राष्ट्राच्या जासुदांना काय उत्तर द्यावे? “परमेश्वराने सीयोन स्थापली आहे; त्याच्या लोकांपैकी दीनदुर्बळ तिच्यात आश्रय करून आहेत.”


“मसलत दे, निर्णय कर; भरदुपारी आपली छाया रात्रीसारखी कर; घालवून दिलेल्यांना लपव, भटकणार्‍यांना दाखवून देऊ नकोस.


कारण तू आपल्या तारणकर्त्या देवाला विसरलास व आपल्या आश्रयाच्या दुर्गाचे स्मरण केले नाहीस; म्हणून तू मनोरम झाडांची2 लागवड केली व परदेशीय3 द्राक्षलतेची कलमे लावलीस;


पण त्याने माझा आश्रय धरावा; त्याने माझ्याबरोबर दोस्ती करावी, माझ्याबरोबर दोस्ती करावी.”


न्यायासनावर बसणार्‍याला न्यायस्फूर्ती, वेशीवर हल्ला करणार्‍या शत्रूला हटवणार्‍यांना वीरश्री असा तो होईल.


नम्र जनांचा परमेश्वराच्या ठायीचा आनंद वृद्धी पावेल; लोकांतील दीन जन इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या ठायी उल्लास पावतील.


कारण जुलमी नाहीतसे झाले आहेत; हेटाळणी करणारे आटोपले आहेत, वाइटाला जागणारे सर्व समूळ उच्छेद पावले आहेत.


तरी तुझ्या शत्रूंचा समुदाय रजःकणांसारखा होईल, तुला पिडणार्‍यांचा समुदाय उडणार्‍या भुसासारखा होईल; हे एका क्षणात, एकाएकी घडेल.


वार्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल.


तो उच्च स्थानी वास करील, दुर्गम पहाड त्याचा दुर्ग होईल, त्याला अन्नाचा मुबलक पुरवठा होईल, त्याचे जल आटणार नाही;


हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर; आम्ही तुझी आशा धरून आहोत; रोज सकाळी तू आमचा भुज हो, आणि संकटसमयी आमचा उद्धारक हो.


मग परमेश्वराच्या दिव्यदूताने जाऊन अश्शूरी गोटातल्या एक लक्ष पंचाऐंशी हजार लोकांना मारले; पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते!


परमेश्वर म्हणतो, “हो, वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येतील; जुलमी पुरुषाने केलेली लूट सोडवण्यात येईल; कारण तुझ्याशी युद्ध करणार्‍याबरोबर मी युद्ध करीन व तुझ्या मुलांचा उद्धार करीन.


तू धावा करशील तेव्हा तुझ्या मूर्तींच्या समुदायाने तुला सोडवावे; त्या सगळ्यांना तर वारा उडवून नेईल, एक फुंकर त्यांना घेऊन जाईल; पण जो माझा आश्रय करील तो पृथ्वीचे वतन पावेल आणि माझ्या पवित्र पर्वताचा ताबा घेईल.


परमेश्वर म्हणतो, “ह्या सर्व वस्तू माझ्याच हाताने बनलेल्या आहेत; म्हणून त्या माझ्या झाल्या आहेत; पण जो दीन व भग्नहृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडे मी पाहतो.


म्हणजे तो तुम्हांला पवित्रस्थान होईल; तथापि इस्राएलाच्या उभय घराण्यांत तो ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक आणि यरुशलेमेच्या रहिवाशांना पाश व सापळा असा होईल.


हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, माझ्या दुर्गा, संकटसमयीच्या माझ्या आश्रया, पृथ्वीच्या दिगंतापासून राष्ट्रे तुझ्याकडे येऊन म्हणतील, “आमच्या पूर्वजांना खोट्या, निरर्थक व निरुपयोगी अशा वस्तूंचाच काय तो वतनभाग मिळाला.


तू तुफानासारखा चालून येशील, भूमीला मेघ झाकतो त्यासारखा तू होशील; तू, तुझे सर्व सेनासमूह व तुझ्यासह अनेक राष्ट्रांचे लोक असे तुम्ही सर्व याल.


मी तुझ्यामध्ये नम्र व गरीब लोक राहू देईन, ते परमेश्वराच्या नामावर श्रद्धा ठेवतील.


माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही?


Lean sinn:

Sanasan


Sanasan