Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 25:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 जसा पोहणारा पोहण्यासाठी झेपा टाकतो तसा तो तिच्यात झेपा टाकील; त्याने आपल्या हाताची करामत कितीही चालवली तरी परमेश्वर त्याचा गर्व दडपून टाकील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 पाण्यात पोहणारा पोहण्यासाठी हातांनी पाणी सारतो तसेच देव त्यांना दूर सारील व त्यांचा सर्व अभिमान, गर्व व सर्व दुराचार याचा नाश करून त्यांचा शेवट करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जसे पोहणारे पोहण्यासाठी त्यांचे हात लांब करतात तसे ते त्यांचे हात त्यांच्यावर लांब करतील. त्यांच्या हातात चतुराई असतानाही परमेश्वर त्यांचा अभिमान उतरवून टाकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 25:11
26 Iomraidhean Croise  

तुझ्या क्रोधाला भरते येऊ दे, आणि प्रत्येक गर्विष्ठाला पाहून त्याची मानखंडना कर.


पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यांना घाबरे करील.


पाहा, प्रभू सेनाधीश परमेश्वर फांद्या भयंकर झपाट्याने छाटत आहे; उंच वाढलेली खोडे तोडून टाकली जात आहेत; उन्नत नीच होत आहेत.


मी जगाचे त्याच्या दुष्टतेबद्दल व पातक्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल पारिपत्य करीन; गर्विष्ठांचा दिमाख बंद करीन, जुलम्यांचा तोरा उतरवीन.


सर्व पृथ्वीविषयी योजलेला संकल्प हाच आहे; सर्व राष्ट्रांवर उगारलेला हात हाच आहे.


आता परमेश्वर म्हणतो, “सालदाराच्या मुदतीप्रमाणे तीन वर्षांत मवाबाचे वैभव त्याच्या सगळ्या मोठ्या समुदायासह क्षीण होईल; त्याचा अवशेष राहील, पण तो अत्यल्प; म्हणण्यासारखा नसणार.”


मवाबाच्या गर्वाविषयी आम्ही ऐकून आहोत; तो मोठा अभिमानी आहे; त्याचा उन्मत्तपणा, त्याचा गर्व व त्याचा क्रोध ह्यांविषयी आम्ही ऐकून आहोत; त्याची बढाई निरर्थक आहे.


परमेश्वराच्या भयप्रद दृष्टीपुढून, त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापांपुढून खडकात दडून जा; आपणाला धुळीत पुरून घे.


त्या दिवशी लोकांची उन्मत्त दृष्टी नीच होईल, माणसांचा गर्व उतरेल; व परमेश्वरच काय तो उच्च स्थानी विराजेल.


सर्व उंच बुरूज, सर्व मजबूत तट;


रुक्ष भूमीवरील जसा सूर्याचा ताप शांत व्हावा तसा निर्दय लोकांचा गोंगाट तू शांत करतोस; मेघांच्या छायेने जसा सूर्याचा ताप क्षीण होतो तसे बलात्कार्‍यांचे जयगीत होते.


ह्यासाठी परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे; त्याने आपला हात त्यांच्यावर उगारून त्यांना मारले आहे, आणि डोंगर थरारले; त्यांची प्रेते रस्त्यातल्या घाणीसारखी आहेत. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल; कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला, त्याने आपणास अपराध्यांत गणू दिले; त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.


जो चांगला नाही अशा मार्गाने स्वच्छंदपणे चालणार्‍या फितुरी लोकांपुढे मी आपले हात नित्य केले;


आम्ही मवाबाचा गर्व ऐकून आहोत, तो अति गर्विष्ठ आहे, त्याचा ताठा, त्याचा अहंकार, त्याचा अभिमान, त्याची उन्मत्तता आम्ही ऐकून आहोत.


मवाब नाश पावून राष्ट्ररूप राहणार नाही, कारण त्याने परमेश्वराविरुद्ध बढाई केली आहे.


तरी पुढील काळी मी मवाबाचा बंदिवास उलटवीन, असे परमेश्वर म्हणतो.” येथे मवाबाच्या शासनाचे कथन संपले.


मी बेल दैवताचा बाबेलात समाचार घेईन, त्याने गिळले ते त्याच्या तोंडावाटे मी काढीन, राष्ट्रांचा ओघ त्याच्याकडे वाहणार नाही; बाबेलचा तटही पडेल.


आता मी नबुखद्नेस्सर स्वर्गीच्या राजाचे स्तवन करतो, त्याचा जयजयकार करतो व त्याचा महिमा वर्णन करतो; कारण त्याची सर्व कृत्ये सत्य आहेत, त्याचे सर्व मार्ग न्याय्य आहेत; जे अभिमानाने चालतात त्यांना त्याला नीचावस्थेत लोटता येते.


त्याने सत्ताधीशांना व अधिकार्‍यांना नाडून त्यांच्याविरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले.


तो अधिक ‘कृपा करतो;’ म्हणून शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan