Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 25:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 परमेश्वराचा हात ह्या डोंगरावर राहील, व जसे शेणाच्या खाईतील रेंद्यात गवत तुडवतात तसे मवाबास जागच्या जागी तुडवतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 कारण परमेश्वराचा हात यरूशलेमेला आर्शीवाद देण्यासाठी सियोन पर्वतावरून उचलला जाईल व त्याचे आर्शीवाद सदैव यरूशलेमेतील लोकांबरोबर राहतील, पण मवाब गवताप्रमाणे पायाखाली तुडवील जाईल व फेकल्या जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 याहवेहचा हात या पर्वतावर राहील; परंतु जसे कडबा खतामध्ये तुडविला जातो, तसे मोआबी त्यांच्या भूमीत तुडविले जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 25:10
27 Iomraidhean Croise  

ते एन-दोर येथे नाश पावले; ते शेताला खत झाले.


मदमेना पळत आहे; गेबीमातील रहिवासी पळ काढण्यासाठी आपली मालमत्ता गोळा करत आहेत.


मी त्याला अधर्मी राष्ट्रावर पाठवीन. माझ्या क्रोधास पात्र झालेल्या लोकांची लूट हरण करावी, त्यांनी लुबाडलेल्या मत्तेचा अपहार करावा व त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडवावे, अशी त्यांच्यासंबंधाने त्यास आज्ञा करीन.


त्या दिवशी असे होईल की राष्ट्रांसाठी ध्वजवत उभारलेल्या इशायाच्या धुमार्‍याला राष्ट्रे शरण येतील; त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल.


ते पश्‍चिमेकडे पलिष्ट्यांच्या खांद्यावर (खालाटीवर) झडप घालतील; ते एकत्र होऊन पूर्वदेशीयांना लुटतील; अदोम व मवाब ह्यांना हस्तगत करतील; आणि अम्मोनी त्यांना वश होतील.


अगे सीयोननिवासिनी, जयघोष कर, गजर कर; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझ्या ठायी थोर आहे.”


पण तुला फेकून दिलेल्या फांदीप्रमाणे आपल्या थडग्यापासून दूर झुगारून दिले आहे; वधलेले, तलवारीने विंधलेले, गर्तेच्या धोंड्यामध्ये पडलेले ह्यांनी तू वेष्टला आहेस. पायांखाली तुडवलेल्या मढ्यासारखा तू झाला आहेस.


आता परमेश्वर म्हणतो, “सालदाराच्या मुदतीप्रमाणे तीन वर्षांत मवाबाचे वैभव त्याच्या सगळ्या मोठ्या समुदायासह क्षीण होईल; त्याचा अवशेष राहील, पण तो अत्यल्प; म्हणण्यासारखा नसणार.”


मवाबाच्या गर्वाविषयी आम्ही ऐकून आहोत; तो मोठा अभिमानी आहे; त्याचा उन्मत्तपणा, त्याचा गर्व व त्याचा क्रोध ह्यांविषयी आम्ही ऐकून आहोत; त्याची बढाई निरर्थक आहे.


परमेश्वराने मला सांगितले की : “सूर्य प्रकाशत असता स्वच्छ ऊन पडते व कापणीच्या समयी उष्णकाळी दहिवरयुक्त अभ्र येते, तसा मी शांत राहून आपल्या निवासस्थानातून अवलोकन करीन.”


सेनाधीश परमेश्वर ह्या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करत आहे; उत्कृष्ट मिष्टान्नाची व राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे.


ते पायांखाली तुडवतील. गरिबांचे पाय, दीनाची पावलेदेखील ते तुडवतील.”


ह्यासाठी परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे; त्याने आपला हात त्यांच्यावर उगारून त्यांना मारले आहे, आणि डोंगर थरारले; त्यांची प्रेते रस्त्यातल्या घाणीसारखी आहेत. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


मवाबाविषयी : सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, “अरेरे! बिचारे नबो; ते ओसाड झाले आहे; किर्याथाईमाची फजिती झाली आहे, ते हस्तगत झाले आहे; मिस्गाबाची फजिती होऊन ते भंगले आहे;


मवाबकन्येची कीर्ती नाहीशी झाली आहे. हेशबोनात तिच्याविरुद्ध कट करीत आहेत : ते म्हणतात, ‘चला, आपण तिचे राष्ट्रत्व मोडून टाकू.’ हे मदमेना, तू सामसूम होशील; तुझ्यामागे तलवार लागेल.


प्रभूने माझ्यामधले माझे सर्व वीर तुच्छ केले आहेत; माझ्या तरुणांना चिरडून टाकावे म्हणून त्याने माझ्याविरुद्ध प्रचंड समुदाय बोलावला आहे; यहूदाच्या कुवार कन्येला प्रभूने द्राक्षकुंडात तुडवले आहे.


प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मवाब व सेईर म्हणतात की, ‘पाहा, यहूदाचे घराणे इतर राष्ट्रांसारखेच आहे;’


ह्या प्रकारे रहदारीचे एकंदर क्षेत्र अठरा हजार हात असावे; ह्या नगराचे नाव येथून पुढे याव्हे-शाम्मा (तेथे परमेश्वर आहे) असे पडेल.”


सीयोनकन्ये, ऊठ, मळणी कर; मी तुझे शिंग लोखंडासारखे व तुझे खूर पितळेसारखे करतो; तू अनेक राष्ट्रांचा चुराडा करशील, त्यांची कमाई परमेश्वराला वाहशील, त्यांची संपत्ती सकल पृथ्वीच्या प्रभूला तू वाहशील.


म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, आपल्या जीविताची शपथ वाहून म्हणतो, “मवाब सदोमासारखे निश्‍चये होईल, अम्मोन वंशज गमोर्‍यासारखे होतील; खाजकुयरीचे वतन व मिठागर ही सर्वकाळ वैराण होतील; माझ्या लोकांचे अवशिष्ट जन त्यांना लुटतील; माझ्या राष्ट्रांचे अवशिष्ट राहिलेले लोक त्यांचा ताबा घेतील.”


मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही; त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही; याकोबातून एक तारा उदय पावेल, आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल, तो मवाबाचा कपाळमोक्ष करील, सर्व बंडखोरांना चीत करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan