Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 24:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ह्यास्तव पृथ्वी शापाने ग्रासली आहे, तिचे रहिवासी पापाचे फळ भोगत आहेत; पृथ्वीचे रहिवासी जळून भस्म झाले आहेत, मानव थोडेच उरले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्यामुळे सार्वकालिक करार शापित झाला आहे व तेथे राहणारे दोषी आढळले आहेत. त्यांना त्याचे फळ भोगावे लागत आहे; शापाचा परिणाम म्हणून पुष्कळ लोक भस्म होतील व फार थोडे उरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 म्हणून शाप पृथ्वीला भस्मसात करतो. तिच्या लोकांना त्यांच्या दोषाचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे पृथ्वीचे रहिवासी जळून गेले आहेत, आणि फारच थोडे उरले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 24:6
28 Iomraidhean Croise  

तेव्हा यहूदाचा राजा यहोयाखीन आपली आई, सेवक, सरदार व खोजे ह्यांना बरोबर घेऊन बाबेलच्या राजाकडे गेला; बाबेलच्या राजाने आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी त्याला पकडले.


देशातले जे लोक अतिशय कंगाल होते त्यांना गारद्यांच्या सरदाराने द्राक्षांच्या मळ्यांची व शेतांची मशागत करण्यास मागे ठेवले.


बलाढ्य मनुष्य पिंजलेल्या तागासारखा होईल, आणि त्याच्या हातचे काम ठिणगी होईल; ती दोन्ही बरोबरच जळतील, ती कोणी विझवणार नाही.


सेनाधीश परमेश्वराने आमच्यासाठी यत्किंचित शेष राखून ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोर्‍याप्रमाणे बनलो असतो.


कारण माझ्या तलवारीस आकाशात उन्माद चढला आहे; पाहा, शासन करण्यासाठी अदोमावर, ज्या लोकांचा सर्वस्वी नाश करण्याचे मी योजले आहे त्यांच्यावर ती उतरेल.


म्हणून मी पवित्र अधिपतींना अपवित्र ठरवले, याकोबाला शापवश व इस्राएलास निंदावश केले आहे.


ह्यास्तव अग्नीची ज्वाला धसकट खाऊन टाकते व वाळलेल्या गवताचे अग्नीत भस्म होऊन जाते तसे त्यांचे मूळ कुजलेल्या पदार्थासारखे होईल; त्यांचा फुलवरा धुळीसारखा उडून जाईल; कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराचे नियमशास्त्र तुच्छ लेखले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे वचन अव्हेरले आहे.


सेनाधीश परमेश्वराच्या क्रोधाने भूमी जळून खाक झाली आहे; लोकही जसे काय अग्नीला सरपण झाले आहेत; आपल्या भावालाही कोणी सोडत नाही.


देशाने कोठवर शोक करावा? सर्व देशातली वनस्पती कोठवर सुकणार? त्यात वस्ती करणार्‍यांच्या दुष्टतेने पशुपक्षी नष्ट झाले आहेत, कारण ते म्हणतात, “आमचा अंत तो पाहणार नाही.”


ह्यामुळे परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “तुम्ही असे बोलता म्हणून पाहा, मी आपले शब्द तुझ्या मुखात अग्नी असे आणि हे लोक सरपण असे करीन आणि तो त्यांना खाऊन टाकील.


त्यांतले थोडेसे केस घेऊन आपल्या वस्त्राच्या पदरी बांध.


मी तुमच्यावर वनपशू सोडीन आणि ते तुमची मुले उचलून नेतील, तुमच्या गुराढोरांचा नाश करतील, तुमची संख्या अगदी कमी करतील आणि त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या नावाचा महिमा व्हावा ह्यासाठी तुम्ही ऐकून मन लावले नाही, तर मी तुमच्यावर शाप पाठवीन व तुमचे आशीर्वाद शाप करीन; तुम्ही लक्ष पुरवत नाही म्हणून मी त्यांना शापरूप करून चुकलो आहे.


तुम्ही शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवले आहे.


पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे; सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील; तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवील; नाहीतर कदाचित मी येईन आणि भूमीला शापाने ताडन करीन.”


सर्व लोकांनी उत्तर दिले की, “त्याचे रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर असो.”


परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.


यशयाही इस्राएलाविषयी असे पुकारतो की, “जरी इस्राएल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली, तरी अवशेष मात्र तारण पावेल;


तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही म्हणून आकाशातील तार्‍यांप्रमाणे तुम्ही अगणित झाला तरी थोडके उराल.


परमेश्वर तुम्हांला इतर राष्ट्रांत विखरील; ज्या ज्या राष्ट्रात परमेश्वर तुम्हांला घालवील तेथे तुमची संख्या अल्प राहील.


तरी रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.1


Lean sinn:

Sanasan


Sanasan