Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 24:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 पृथ्वी अगदी रिक्त होईल, तिची लूट होईल; कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 पृथ्वी पूर्णपणे उध्वस्त केली जाईल आणि नागाविली जाईल, कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 पृथ्वी पूर्णपणे पडीक जमीन होईल आणि संपूर्णपणे लुटली जाईल. हे शब्द याहवेह बोलले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 24:3
16 Iomraidhean Croise  

परमेश्वराने यिर्मयाच्या मुखाने प्रकट केलेले वचन पुरे होऊन देशास शांततेचा3 काळ प्राप्त व्हावा म्हणून हे सर्व घडले; देश ओस पडला होता तोवर म्हणजे सत्तर वर्षे पुरी होईपर्यंत त्यात शांतता नांदत होती.


आणि केदार देशातील धनुर्धारी वीरांची संख्या थोडीच उरेल; कारण परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे बोलला आहे.”


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मजबूत ठिकाणी बसेलली खुंटी ढळेल; ती कापली जाऊन खाली पडेल व तिच्यावरील भार छेदला जाईल;’ कारण परमेश्वर हे बोलला आहे.”


पाहा, परमेश्वर पृथ्वी रिक्त करीत आहे, तिला ओसाड करीत आहे, तिला विरूप करीत आहे व तिच्या रहिवाशांची दाणादाण करीत आहे.


तेव्हा जशी लोकांची तशी याजकाची, चाकराची तशी धन्याची, दासीची तशी धनिणीची, विकत घेणार्‍याची तशी विकत देणार्‍याची, सावकाराची तशी कुळाची, धनकोची तशी ऋणकोची स्थिती होईल.


पृथ्वी शोकाकुल व कृश झाली आहे; जग झुरून कृश झाले आहे; पृथ्वीवरील प्रतिष्ठित जन जर्जर झाले आहेत.


तरी हे लुटलेले, नागवलेले लोक आहेत; ते सर्व गर्तांच्या पाशात सापडले आहेत, कारागृहात कोंडले आहेत; ते भक्ष्य झाले आहेत, त्यांना सोडवणारा कोणी नाही; ते लूट झाले आहेत, आणि “ती परत द्या” असे म्हणणारा कोणी नाही.


मी तो उद्ध्वस्त करीन; त्याला कोणी खच्ची करणार नाही व कुदळणार नाही; त्यात काटेसराटे उगवतील; त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघांना करीन.


मी म्हणालो, “हे प्रभू, असे कोठवर?” तो म्हणाला, “नगरे निर्जन होतील, घरे निर्मनुष्य होतील, जमीन ओसाड व वैराण होईल,


तुम्ही ऐका, कान द्या, गर्विष्ठ होऊ नका, कारण परमेश्वर हे बोलला आहे.


ह्यास्तव इस्राएलाच्या पर्वतांनो, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका; आसपासच्या राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेल्या लोकांना लूट व निंदेचा विषय झालेले पर्वत व टेकड्या, नाले व खोरी, उजाड व ओसाड नगरे ह्यांना प्रभू परमेश्वर असे म्हणतो की,


त्या दिवसांत लोक तुम्हांला उद्देशून बोलतील, विव्हळून शोक करतील व म्हणतील, “आमचा अगदी समूळ नाश झाला. त्याने माझ्या लोकांचा वाटा परक्यांच्या स्वाधीन केला आहे; तो माझ्यापासून कसा काढून घेतला आहे! आमचे क्षेत्र बंडखोरांना त्याने वाटून दिले आहे.”


ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांना घाबरवणार नाही; कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.


आणि हा सर्व देश गंधक व खार ह्यांनी इतका जळून गेला आहे की, येथे काही पेरणीकापणी होत नाही, येथे गवत उगवत नाही, पण परमेश्वराने कोपायमान व क्रोधयुक्त होऊन सदोम, गमोरा, अदमा व सबोईम ह्यांचा विध्वंस केला तसा ह्याचाही केला आहे, हे त्यांना दिसेल;


परमेश्वराने रागाने, क्रोधाने व महाकोपाने ह्या त्यांच्या देशातून त्यांचे उच्चाटन केले व दुसर्‍या देशात त्यांना फेकून दिले, हे आज आपण पाहतच आहोत.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan