Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 24:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 बंदिवानांना जसे अंधारकोठडीत कोंडतात, तसे त्यांना कोंडतील व कारागृहात ठेवतील; आणि बहुत दिवसांनी त्यांची झडती घेतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 त्यांना एकत्रित करून अंधार कोठडीत आणि कारागृहात बंद करून ठेवील, नंतर त्यांचा न्याय केला जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 त्यांना एकत्र गोळा करण्यात येईल आणि कैद्यांसारखे त्यांना अंधारकोठडीत टाकण्यात येईल; त्यांना कारागृहात कोंडून ठेवण्यात येईल. आणि त्यांना अनेक दिवसांकरिता शिक्षा देण्यात येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 24:22
11 Iomraidhean Croise  

बंदिवानांच्या पायांशी दबून राहणे व वध झालेल्यांच्या खाली पडून राहणे ह्यांशिवाय त्यांना दुसरी गती नाही. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


परमेश्वर पृथ्वीस भयकंपित करण्यास उठेल तेव्हा त्याच्या भयप्रद दृष्टीपुढून व त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापापुढून लोक खडकांतल्या गुहांत व भूमीच्या विवरांत शिरतील.


हे पृथ्वीवरील रहिवाशा, दरारा, खाडा व पाश हे तुझ्यापुढे आहेत!


तरी हे लुटलेले, नागवलेले लोक आहेत; ते सर्व गर्तांच्या पाशात सापडले आहेत, कारागृहात कोंडले आहेत; ते भक्ष्य झाले आहेत, त्यांना सोडवणारा कोणी नाही; ते लूट झाले आहेत, आणि “ती परत द्या” असे म्हणणारा कोणी नाही.


बहुत दिवस लोटल्यावर तुझा समाचार घेण्यात येईल; शेवटल्या वर्षी जो देश तलवारीपासून वाचेल व ज्या देशात अनेक राष्ट्रांतून जमा केलेले लोक पुनःपुन्हा उद्ध्वस्त होत असलेल्या इस्राएल पर्वतांवर वस्ती करतील, त्या देशावर तू चढाई करशील; तथापि त्या लोकांना राष्ट्रांतून बाहेर आणले असून ते सर्व निर्भय राहतील.


तुझ्याविषयी म्हणशील तर तुझ्याबरोबर केलेल्या कराराच्या रक्तसिंचनामुळे मी तुझ्या बंदिवानांना निर्जल गर्तेतून मुक्त करीन.


आशा धरून राहिलेले बंदिवानहो, दुर्गाकडे परत या; आज मी हे जाहीर करतो की, मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन.


त्याने ‘दियाबल’ व ‘सैतान’ म्हटलेला जुनाट ‘साप’ म्हणजे तो अजगर ह्याला धरले, आणि त्याने एक हजार वर्षेपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan