Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 24:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 त्या दिवशी असे होईल की उच्च आकाशात आकाशस्थांचे सैन्य व भूमीवर भूमीचे राजे ह्यांची परमेश्वर झडती घेईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 त्या दिवशी असे होईल की परमेश्वर उंच ठिकाणी असलेल्या सैन्याला उंच ठिकाणी, आणि पृथ्वीच्या राजांना पृथ्वीवर शिक्षा करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 त्या दिवशी याहवेह, वर आकाशातील अधिपतींना आणि खाली पृथ्वीवरील राजांना शिक्षा करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 24:21
23 Iomraidhean Croise  

अधिपतींची हिंमत तो नष्ट करतो; पृथ्वीवरील राजांना तो भयप्रद आहे.


ह्यास्तव प्रभूने सीयोन डोंगर यरुशलेम ह्यासंबंधाने आपले समग्र कार्य समाप्त केल्यावर असे होईल की अश्शूरचा राजा ह्याच्या मनातील गर्वाचा परिणाम व त्याच्या उन्मत्त दृष्टीचा दिमाख ह्यांचा बदला मी घेईन.


मी जगाचे त्याच्या दुष्टतेबद्दल व पातक्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल पारिपत्य करीन; गर्विष्ठांचा दिमाख बंद करीन, जुलम्यांचा तोरा उतरवीन.


गर्विष्ठ, उन्मत्त व चढेल अशा सर्वांसाठी सेनाधीश परमेश्वराने दिवस नेमला आहे; त्या दिवशी ते नीच होतील.


पृथ्वी शोकाकुल व कृश झाली आहे; जग झुरून कृश झाले आहे; पृथ्वीवरील प्रतिष्ठित जन जर्जर झाले आहेत.


राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे आणावी, त्यांचे राजे तुझ्याकडे मिरवत आणावेत म्हणून तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील, त्या अहोरात्र बंद म्हणून राहणार नाहीत.


हे मानवपुत्रा, गोगाविरुद्ध संदेश देऊन सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे गोगा, रोश, मेशेख व तुबाल ह्यांच्या अधिपती, पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे;


उघड्या मैदानात तू पडशील, कारण मी हे बोललो आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


मिसर देश उजाड होईल व अदोम वैराण होईल, कारण त्यांनी आपल्या देशात निर्दोष रक्त पाडून यहूदाच्या वंशजांवर बलात्कार केला.”


परमेश्वराच्या यज्ञाच्या दिवशी असे होईल की, “सरदार, राजपुत्र व ज्या सर्वांनी परदेशी पोशाख चढवला आहे त्यांचा मी समाचार घेईन.


हे कोकर्‍याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यांना जिंकील, कारण तो ‘प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे;’ आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत.”


‘पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म’ व विलास ‘केला’ ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील तेव्हा तिच्याकरता ‘रडतील व ऊर बडवून घेतील.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan