Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 24:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा जशी लोकांची तशी याजकाची, चाकराची तशी धन्याची, दासीची तशी धनिणीची, विकत घेणार्‍याची तशी विकत देणार्‍याची, सावकाराची तशी कुळाची, धनकोची तशी ऋणकोची स्थिती होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 आणि जशी लोकांची तशी याजकांची, जशी सेवकाची तशी धन्याची, जशी दासीची तशी तिच्या धनिणीशी, जशी विकत घेणाऱ्याची तशी विकणाऱ्याची, जशी उसणे देणाऱ्याची तशी उसणे घेणाऱ्याची, जशी उधार घेणाऱ्याची तशी जो त्यास उधार देतो त्याची स्थिती होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 ते प्रत्येकासाठी समान असेल, जसे लोकांसाठी तसेच याजकासाठी जसे सेवकासाठी तसेच त्याच्या मालकासाठी जसे सेविकेसाठी तसेच तिच्या मालकिणीसाठी, जसे खरेदी करणाऱ्यांसाठी तसेच विकत घेणाऱ्यांसाठी, जसे उसने देणाऱ्यासाठी तसेच उसने घेणाऱ्यासाठी, जसे कर्जदारांसाठी तसेच कर्जदात्यांसाठी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 24:2
26 Iomraidhean Croise  

दुष्काळ पडण्यापूर्वी ओन येथील याजक पोटीफरा ह्याची मुलगी आसनथ हिच्यापासून योसेफाला दोन मुलगे झाले.


जे तलवारीच्या तडाख्यातून वाचले त्या सर्वांना तो राजा बाबेलास घेऊन गेला; पारसाचे राज्य स्थापित होईपर्यंत ते त्याचे व त्याच्या वंशजांचे दास होऊन राहिले;


हलका मनुष्य लवला आहे, थोर मनुष्य नीचावस्था पावला आहे; त्यांना तू क्षमा करूच नकोस.


पृथ्वी अगदी रिक्त होईल, तिची लूट होईल; कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे.


हेही द्राक्षारसाने भेलकांडत आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत; याजक व संदेष्टा हे मद्याने भेलकंडत आहेत, द्राक्षारसाने गुंग झाले आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत; ते दृष्टान्त पाहताना भेलकंडतात, निर्णय सांगताना झोके खातात.


हलके लोक दबले आहेत, बडे लोक नीचावस्था पावले आहेत, गर्विष्ठांची मान खाली झाली आहे.


त्या प्रसंगी इश्माएल बिन नथन्या व त्याच्याबरोबरची दहा माणसे ह्यांनी उठून गदल्या बिन अहीकाम बिन शाफान, ज्याला बाबेलच्या राजाने देशावर अधिपती म्हणून नेमले होते, त्याला तलवारीने ठार मारले.


“कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, माझा क्रोध व संताप ह्यांचा जसा यरुशलेमेत राहणार्‍यांवर वर्षाव झाला तसा तुम्ही मिसर देशात गेल्यावर तुमच्यावर होईल व तुम्ही निर्भर्त्सना, विस्मय, शाप व निंदा ह्यांचे विषय व्हाल; व हे ठिकाण तुमच्या दृष्टीस पुन्हा पडणार नाही.


तिच्या संदेष्ट्यांच्या पातकांमुळे व तिच्या याजकांच्या दुष्कर्मांमुळे हे झाले; त्यांनी तिच्या वस्तीत नीतिमानांचा रक्तपात केला आहे.


परमेश्वराच्या मुखाने त्यांना विखरले आहे; तो आता त्यांच्याकडे पाहत नाही; ते याजकाचा मान राखत नाहीत, वडिलांचा सन्मान करीत नाहीत.


सदोमेवर कोणी हात टाकला नसून एका क्षणात तिचा नि:पात झाला; तिच्या पापापेक्षा माझ्या लोकांच्या कन्येचे दुष्कर्म अधिक झाले आहे.


जसा याजक तसे लोक असे होईल; त्यांच्या आचरणाबद्दल मी त्यांना शासन करीन, त्यांच्या कर्माचे प्रतिफळ त्यांना देईन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan