Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 24:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 भूमी अगदी फाटून गेली आहे, भूमी साफ फुटून गेली आहे, भूमी अतिशय हादरून गेली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 पृथ्वी अगदी मोडून गेली आहे, पृथ्वी फाटली आहे. पृथ्वी फार हिंसकरीतीने हलवली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 पृथ्वीचे तुकडे झाले आहेत, पृथ्वी पूर्ण फाटून गेली आहे, पृथ्वीला जबरदस्त हादरा मिळाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 24:19
15 Iomraidhean Croise  

पृथ्वी व तिच्यावर राहणारे सर्व भेदरून गेले. तरी तिचे स्तंभ मीच स्थापले आहेत. (सेला)


मी आकाश कंपायमान करीन व पृथ्वी स्थानभ्रष्ट होईल; सेनाधीश परमेश्वराचा कोप व त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस ह्यांमुळे असे होईल.


परमेश्वर पृथ्वीस भयकंपित करण्यास उठेल तेव्हा त्याच्या भयप्रद दृष्टीपुढून व त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापापुढून लोक खडकांतल्या गुहांत व भूमीच्या विवरांत शिरतील.


त्याच्यापुढे पर्वत कंपायमान होतात व डोंगर विरघळतात; त्याच्यापुढे ही पृथ्वी, हा भूगोल व त्यांवरील सर्व रहिवासी थडथड उडतात.


तो उभा राहिला म्हणजे पृथ्वी हेलकावे खाते; तो नजर टाकून राष्ट्रांना उधळून लावतो. सर्वकाळचे पर्वत विदीर्ण होतात, युगानुयुगीचे डोंगर ढासळतात, त्याचा हा पूर्वकाळापासून प्रघात आहे.


हे त्याचे सगळे शब्द बोलून संपतात न संपतात तोच त्यांच्या पायांखालची भूमी दुभंगली.


आणि पृथ्वीने आपले तोड उघडून ते, त्यांची कुटुंबे, कोरहाची सगळी माणसे व त्यांची सर्व मालमत्ता गिळून टाकली.


तो जैतुनांच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकान्ती येऊन म्हणाले, “ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हांला सांगा.”


त्याचप्रमाणे त्याने रऊबेनी अलीयाबाचे मुलगे दाथान व अबीराम ह्यांचे काय केले, म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून त्यांची कुटुंबे, डेरे आणि त्यांचे अनुचर ह्यांसह त्यांना इस्राएल लोकांदेखत कसे गिळून टाकले, ह्या गोष्टी त्यांनी पाहिल्या नाहीत;


तरी रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.1


त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे तप्त होऊन वितळतील.


‘नंतर’ मोठे पांढरे ‘राजासन’ व त्यावर ‘बसलेला’ एक जण ‘माझ्या दृष्टीस पडला;’ त्याच्या ‘तोंडापुढून पृथ्वी’ व आकाश हे ‘पळाले; त्यांकरता ठिकाण उरले नाही.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan