Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 24:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 नीतिमानाची प्रतिष्ठा होवो अशी गीते दिगंतापासून आमच्या कानी पडली. तेव्हा मी म्हणालो, “माझा नाश झाला हो नाश झाला! हायहाय! ठकांनी ठकवले, ठकांनी ठकबाजीने ठकवले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 पृथ्वीच्या सीमेतून आम्ही अशी गीते ऐकली आहेत की, “धार्मिकास वैभव असो.” पण मी म्हणालो, मी वाया गेलो आहे, मी दूर वाया गेलो आहे, मला हाय हाय! कारण विश्वास घातकीने विश्वासघात केला आहे, होय, विश्वास घातक्याने विश्वास घात केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 पृथ्वीच्या दिगंतापासून आपण हे गाणे ऐकतो: “नीतिमान परमेश्वराचा गौरव असो.” पण मी म्हणालो, “माझा नाश होत आहे, माझा नाश होत आहे! माझा धिक्कार असो! फसवणूक करणारा विश्वासघात करतो! फसवणूक करून तो विश्वासघात करतो!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 24:16
41 Iomraidhean Croise  

तेव्हा त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना दिले, पण त्यांचा जीव झुरणीस लावला.


विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे, कारण ते तुझे वचन पाळत नाहीत.


माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन;


सूड घेतलेला पाहून नीतिमान हर्ष पावेल; दुष्टांच्या रक्तात तो आपले पाय धुईल,


म्हणून जे सीमान्त प्रदेशात राहतात तेही तुझ्या उत्पातांना भितात; दिवसाचा उदय व अस्त ह्यांच्या द्वारे तू गजर करवतोस.


देव आम्हांला आशीर्वाद देवो, व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत.


त्याने इस्राएलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता ह्यांचे स्मरण केले आहे; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.


हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे?


ह्यास्तव प्रभू, सेनाधीश प्रभू, त्याच्या पुष्ट जनांना रोडपणा आणील; त्याच्या वैभवाखाली, अग्निज्वालेसारखी ज्वाला भडकेल.


तो राष्ट्रांसाठी निशाण उभारील, व पृथ्वीच्या चार्‍ही दिशांकडून इस्राएलातल्या घालवून दिलेल्यांना एकत्र करील व यहूदातल्या परागंदा झालेल्यांना गोळा करील.


त्या दिवशी असे होईल की याकोबाचे वैभव क्षय पावेल, त्याचा पुष्ट देह रोड होईल.


मला कष्टप्रद दृष्टान्त झाला आहे; लुटारू लुटत आहे, ठक ठकबाजी करीत आहे. हे एलामा, चढाई कर; हे मादया, वेढा घाल; त्याच्यामुळे लोक टाकत असलेले सर्व उसासे मी थांबवतो.


तू राष्ट्रांची वाढ केली आहेस, हे परमेश्वरा, तू राष्ट्रांची वाढ केली आहेस; तू आपला महिमा दाखवला आहेस; तू देशाच्या चतुःसीमा वाढवल्या आहेत.


त्या दिवशी सेनाधीश परमेश्वर, आपल्या अवशिष्ट लोकांना वैभवी मुकुट, शोभिवंत किरीट असा होईल.


अरे लुटार्‍या, तुला लुटले नाही; अरे ठका, तुला ठकवले नाही; तुला धिक्कार असो! तुझे लुटणे आटपले म्हणजे तुला लुटतील; तुझे ठकवणे आटपले म्हणजे तुला ठकवतील.


अहो समुद्रावर पर्यटन करणारे व त्यात राहणारे सर्व लोकहो, अहो द्वीपांनो, तुम्ही आपल्या रहिवाशांसह परमेश्वराला नवगीत गा, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची स्तोत्रे गा.


तू त्या ऐकल्या नव्हत्या, जाणल्या नव्हत्या; प्राचीन काळापासून तुझे कान उघडले नव्हते, कारण तू विश्वासघातकी आहेस; गर्भवासापासून तुला फितुरी हे नाव पडले आहे, हे मला ठाऊक होते.


परमेश्वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारली आहे;1 सगळ्या दिगंतांना आमच्या देवाने केलेले तारण दिसून येत आहे.


तेव्हा मी म्हणालो, “हायहाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले!”


तुझे सर्व लोक नीतिमान होतील, ते भूमीचे वतन सर्वकाळ भोगतील; माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लावलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील,


हे परमेश्वरा, मी तुझ्याशी वाद घालू लागलो तर तू न्यायीच ठरशील; तरी मी तुझ्याशी असा वाद करतो की दुष्टांचा मार्ग का सफल होतो? बेइमानी करणार्‍या सर्वांना सुखसमाधान का प्राप्त होते?


कारण तुझे भाऊबंद व तुझ्या बापाचे घराणे हीदेखील तुझ्याशी बेइमानपणे वागली आहेत; त्यांनीदेखील तुझ्यावर शब्दांचा भडिमार केला आहे; ती तुझ्याशी गोड बोलली तरी त्यांचा विश्वास धरू नकोस.”


इस्राएलाच्या घराण्या, बायको बेइमान होऊन आपल्या पतीस सोडते तसे तुम्ही माझ्याशी बेइमान झाला आहात, असे परमेश्वर म्हणतो.”’


कारण इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ही माझ्याशी बेइमानपणे वागली आहेत असे परमेश्वर म्हणतो.


ती रात्रभर रुदन करीत राहते, तिच्या गालांवर अश्रू आलेले आहेत; तिच्या सर्व वल्लभांपैकी तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिला दगा दिला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत.


ते परमेश्वराबरोबर बेइमान झाले आहेत, कारण त्यांना झालेली मुले परकी आहेत; आता चंद्रदर्शन होताच ते आपल्या वतनभागांसह गडप होतील.


त्यांनी मनुष्याप्रमाणे1 करार मोडला आहे; तेथे ते माझ्याबरोबर बेइमानपणे वागले आहेत.


तुमच्यातील जे उरतील ते आपल्या शत्रूंच्या देशांत आपल्या दुष्टतेमुळे खंगत जातील आणि आपल्या वाडवडिलांच्या दुष्टतेमुळे त्यांच्याप्रमाणेच खंगतील.


तो परमेश्वराच्या सामर्थ्याने, आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील, तो कळप चारील; आणि ते वस्ती करतील, कारण त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल.


तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही, अनाचाराकडे दृष्टी लाववत नाही, तो तू ह्या बेइमानी करणार्‍यांकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून नीतिमान त्याला दुष्ट गिळून टाकतो तेव्हा तू का उगा राहतोस?


मला अधर्म का पाहायला लावतोस? विपत्ती मला का दाखवतोस? लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत; कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे.


त्या वेळेस तो देवदूतांना पाठवून ‘चार दिशांकडून, अर्थात पृथ्वीच्या’ सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत ‘आपल्या निवडलेल्या लोकांना’ एकत्र करील.


कारण प्रभूने आम्हांला आज्ञा दिली आहे की, ‘मी तुला परराष्ट्रीयांसाठी प्रकाश करून ठेवले आहे, ह्यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस.”’


‘ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत,’ व ‘कोकर्‍याचे गीत’ गाताना म्हणतात, “हे ‘प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझी कृत्ये थोर व आश्‍चर्यकारक आहेत;’ ‘हे राष्ट्राधिपते,’ ‘तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan