Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 24:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 जैतून वृक्ष हलवल्यावर, द्राक्षांचा हंगाम आटोपल्यावर, सरवा वेचताना जशी थोडीशी फळे राहतात तसे पृथ्वीवरील राष्ट्रांचे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 द्राक्षांचा हंगाम सपंल्यावर व जैतून वृक्ष हलविल्यावर, झाडावर जशी थोडीशी फळे उरतात तशी या देशाची अवस्था झालेली असणार तसे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 जसे जैतून वृक्ष झाडल्यानंतर किंवा द्राक्ष गोळा करून द्राक्षाचा हंगाम संपल्यानंतर उरलले राहतात, तशी देशांची अवस्था होईल, तशी या पृथ्वीची अवस्था होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 24:13
19 Iomraidhean Croise  

सेनाधीश परमेश्वराने आमच्यासाठी यत्किंचित शेष राखून ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोर्‍याप्रमाणे बनलो असतो.


त्या दिवशी असे होईल की याकोबाचे वैभव क्षय पावेल, त्याचा पुष्ट देह रोड होईल.


त्या दिवशी असे होईल की फरात नदाच्या प्रवाहापासून तो मिसरी ओहोळापर्यंत परमेश्वर मळणी करील, आणि इस्राएल लोकांनो, तुम्हांला एकएक असे वेचतील.


त्यात लोकांचा दहावा हिस्सा राहिला तर त्याचाही नाश व्हायचा; तरी एला व अल्लोन ही झाडे तोडल्यावर ज्याप्रमाणे त्यांचा बुंधा राहतो त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील.”2


तलवारीपासून निभावलेले असे अगदी थोडे लोक मिसर देशातून यहूदा देशात परत जातील; आणि जे यहूदाचे सर्व अवशिष्ट लोक मिसर देशात काही दिवस राहण्यास गेले आहेत त्यांना, माझा शब्द खरा ठरतो की त्यांचा खरा ठरतो, हे कळून येईल.


त्यांतले काही निभावतील ते निभावतील, पण ते सगळे खोर्‍यातल्या पारव्यांप्रमाणे डोंगरावर आपल्या अधर्मामुळे घुमत राहतील.


तुम्ही आपल्या भूमीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तू आपल्या शेताच्या कोनाकोपर्‍यातील पीक झाडून सारे कापू नकोस आणि पीक काढून घेतल्यावर त्यातील सरवा वेचू नकोस.


हे याकोबा, मी तुम्हां सर्वांना निश्‍चये एकत्र करीन, इस्राएलाचे अवशेष मी निश्‍चये जमा करीन; मी त्यांना बस्राच्या मेंढरांप्रमाणे एकत्र करीन; लोकसमुदाय मोठा असल्यामुळे कुरणांमधल्या कळपांप्रमाणे ते गजबजतील.


कोण ही माझी विपत्ती! उन्हाळ्यातील फळे काढून घेतल्यावर जशी झाडावर काही राहतात, द्राक्षीच्या वेलीवर जसा सरवा राहतो, तसा मी झालो आहे; खायला द्राक्षांचा एक घोसही राहिला नाही; माझ्या जिवाला आवडेल असा पहिल्या बाराचा अंजीर राहिला नाही.


आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील.


तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाहीत, अशी थोडकी नावे सार्दीस येथे तुझ्याजवळ आहेत; ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan