Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 24:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 बाहेर रस्त्यात द्राक्षारसास्तव ओरड चालली आहे, सर्व उत्सव मावळला आहे, पृथ्वीचा हर्ष लोपला आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 द्राक्षरसामुळे चौका चौकात रडणे आहे. सर्व हर्ष अंधकारमय आहे, भूमीचा आनंद नाहीसा झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 रस्त्यावर ते मद्यासाठी आरडाओरडा करीत आहेत; सगळा आनंद दुःखात बदलला आहे, हर्षोल्हासाचे स्वर पृथ्वीवरून नाहीसे झाले आहेत!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 24:11
18 Iomraidhean Croise  

आमचे बैल लादलेले असावेत; दरोडे, धरपकड व आकांत हे आमच्या रस्त्यांत नसावेत;


मरणाच्या लागास आलेल्यास मद्य दे, खिन्न मनाच्या मनुष्यास द्राक्षारस दे.


सुपीक मळ्यातला आनंद व उल्लास नाहीसा झाला; द्राक्षीच्या मळ्यात गायनाचा व हर्षाचा गजर होत नाही; द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवून कोणी द्राक्षारस काढत नाही; द्राक्षांच्या हंगामातला उत्सवशब्द मी बंद केला आहे.


अहो निश्‍चिंत स्त्रियांनो, एका वर्षाहून काही दिवस अधिक तुम्ही बेचैन व्हाल; कारण द्राक्षांचा हंगाम बुडेल, फळे हाती लागणार नाहीत.


माझ्या लोकांच्या भूमीवर काटेकुसळे उगवतील; ह्या उल्लासी नगराच्या सर्व आनंदमय घरांवरही ती उगवतील.


ते पृथ्वीकडे पाहतील तर पाहा, संकट, अंधकार व दुःखाचे काहूर त्यांना दिसेल; ते निबिड काळोखात लोटले जातील.


सेनाधीश परमेश्वराच्या क्रोधाने भूमी जळून खाक झाली आहे; लोकही जसे काय अग्नीला सरपण झाले आहेत; आपल्या भावालाही कोणी सोडत नाही.


“यहूदा शोक करीत आहे, त्याच्या वेशी उदासवाण्या झाल्या आहेत; ते भूमीवर शोक करीत पडले आहेत; यरुशलेमेची आरोळी वर गेली आहे.


राष्ट्रांनी तुझी अपकीर्ती ऐकली आहे, तुझ्या आक्रोशाने पृथ्वी भरली आहे; कारण वीराला वीर टक्कर देऊन एकत्र पडत आहेत.”


फळबागेतून, मवाब देशातून आनंद व हर्ष नाहीसा केलेला आहे; द्राक्षकुंडांत द्राक्षारस नाही असे मी केले आहे; हर्षनाद करून द्राक्षे कोणी तुडवणार नाही; हर्षनाद होईल तो द्राक्षे तुडवणार्‍यांचा नसणार.


त्यांनी कधी मनापासून माझा धावा केला नाही; ते आपल्या बिछान्यांवर पडून धान्य व द्राक्षारस ह्यांसाठी ओरडतात; ते जमा होऊन माझ्याविरुद्ध बंड करतात.


द्राक्षीचा वेल वाळला आहे, अंजिराचे झाड कोमेजून गेले आहे; डाळिंब, ताड व सफरचंद अशी मळ्यातील सर्व झाडे सुकून गेली आहेत; मानवजातीचा आनंद आटला आहे.


त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे, सर्वसमर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे.


अब्राहाम म्हणाला, ‘मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan