Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 23:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तार्शीशास निघून जा; समुद्रतीरीच्या रहिवाशांनो, हायहाय करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तार्शीशास पार जा, समुद्रतीरी राहणाऱ्यांनो तुम्ही आकांत करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तार्शीश ओलांडून पलीकडे जा; बेटावरील लोकहो, आक्रोश करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 23:6
8 Iomraidhean Croise  

ह्यास्तव मवाब स्वतःविषयी विलाप करील; सर्व लोक शोक करतील, कीर-हरेसेथाच्या मनुकांच्या ढेपांविषयी1 अगदी निराश होऊन तुम्ही उसासा टाकाल.


तलवारी, उपसलेल्या तलवारी, वाकवलेले धनुष्य व घोर संग्राम ह्यांपासून ते पळत आहेत.


अगे तार्शीशकन्ये, तू नील नदीप्रमाणे आपली भूमी व्यापून टाक, तुला आता अटकाव करणारा कटिबंध राहिला नाही.


तो म्हणाला, “हे कलंक लागलेल्या सीदोनाच्या कुमारिके, तू इतःपर उल्लासणार नाहीस; ऊठ, कित्ती लोकांच्या देशात निघून जा; तेथेही तुला थारा मिळणार नाही.”


तार्शीशाहून आणलेले रुप्याचे पत्रे व उफाजचे सोने ह्यांचे कारागिराने केलेले, सोनाराच्या हाताने घडलेले काम त्या आहेत, त्यांना निळा, जांभळा पोशाख चढवतात; त्या सगळ्या कुशल कारागिरांच्या हातचे काम होत.


द्वीपांतले सर्व लोक तुला पाहून विस्मित झाले आहेत; त्यांचे राजे थरथर कापत आहेत; त्यांची तोंडे काळवंडली आहेत.


पण परमेश्वराच्या दृष्टिआड व्हावे म्हणून योना तार्शीशास पळून जाण्यास निघाला, तो याफोस गेला; तेथे त्याला तार्शीशास जाणारे जहाज आढळले; त्याने त्याचे प्रवासभाडे दिले व परमेश्वराच्या दृष्टिआड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शीशास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan