Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 23:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 खास्द्यांचा देश पाहा, तो आता राष्ट्र नाही; त्यांची भूमी अश्शूर्‍यांनी वनचरांसाठी सोडली आहे; त्यांनी मोर्चे लावून तिचे महाल जमीनदोस्त करून ती उद्ध्वस्त केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 खास्दयांचा देश पाहा तो आता नामशेष आहे, अश्शूर देशातील लोकांनी त्यास ओसाड करण्यासाठी जंगली पशुच्या स्वाधिन केले आहे त्यांनी त्यांचे बूरूज वेढा देण्यासाठी स्थापले आहेत व त्याचे ढीगारे बनवतील, समुद्रावर संचार करणाऱ्यानो रडा शोक करा कारण तुमच्या बंदराचा नाश झाला आहे त्याचा पुर्ण विध्वंस केलेला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 खास्द्यांच्या भूमीकडे बघा या लोकांचे आता काहीही महत्त्व राहिले नाही! अश्शूर लोकांनी ते वाळवंटातील श्वापदांसाठी एक ठिकाण केले आहे; त्यांनी त्यांचे वेढा बुरूज उभारले, त्यांनी त्याचे मोठे किल्ले पाडले आणि त्याचे भग्नावशेष केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 23:13
23 Iomraidhean Croise  

हारान आपला बाप तेरह ह्याच्यादेखत आपली जन्मभूमी खास्द्यांचे ऊर येथे मरण पावला.


मग तेरह आपला मुलगा अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा मुलगा लोट आणि आपली सून म्हणजे आपला मुलगा अब्राम ह्याची बायको साराय, ह्यांना बरोबर घेऊन खास्द्यांचे ऊर येथून कनान देशास जायला निघाला; आणि ते हारान येथे जाऊन राहिले.


म्हणून त्या नगराचे नाव ‘बाबेल’ असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले.


तिसर्‍या नदीचे नाव हिद्दकेल; ही अश्शूरच्या पूर्वेला वाहते. चौथ्या नदीचे नाव फरात.


अश्शूराच्या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हमाथ व सफरवाईम ह्या ठिकाणचे लोक आणून इस्राएल लोकांच्या जागी शोमरोनातील नगरांतून वसवले; शोमरोन ताब्यात घेऊन त्यातील नगरांत ते राहू लागले.


त्या वेळेस बाबेलचा राजा बलदानाचा पुत्र बरोदख बलदान ह्याने हिज्कीयाला पत्र व नजराणा पाठवला. कारण तो आजारी असल्याचे त्याने ऐकले होते.


ह्यास्तव परमेश्वराने त्यांच्यावर अश्शूरच्या राजाचे सेनानायक पाठवले. त्यांनी मनश्शेस आकड्यांनी पकडून व बेड्या घालून बाबेलास नेले.


तो हे सांगत आहे इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले, “खास्द्यांनी तीन टोळ्या करून उंटांवर घाला घातला व ते ते घेऊन गेले; त्यांनी तलवारीच्या धारेने गड्यांना वधले, हे तुला सांगायला मी एकटा निभावून आलो आहे.”


अरण्यातले रहिवासी त्याला नमन करोत; त्याचे वैरी धूळ चाटोत.


जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातातील सोटा माझा कहर आहे त्या अश्शूरास धिक्कार असो.


तथापि त्याचा विचार काही असा नाही, त्याच्या मनाचा समज असा नाही; कारण केवळ नासधूस करावी, बहुत राष्ट्रांची कत्तल करावी हेच त्याच्या मनात आहे.


तेव्हा राष्ट्रांचा मुकुटमणी, खास्दी लोकांच्या ऐश्वर्याचे भूषण असा जो बाबेल त्याची, सदोम व गमोरा ह्यांचा देवाने सत्यानाश केला तेव्हाच्यासारखी स्थिती होईल.


तेथे वनपशू बसतील; त्यांच्या घरात घुबडे भरतील; शहामृग तेथे राहतील; बोकडाच्या रूपाची पिशाच्चे तेथे नाचतील;


डोंगरांवरील अधाशी पक्ष्यांसाठी व देशातील गुराढोरांसाठी त्या सर्व पडून राहतील; त्यांवर अधाशी पक्षी उन्हाळा काढतील आणि देशातील सर्व गुरेढोरे हिवाळा काढतील.


परमेश्वर, तुमचा उद्धार करणारा, इस्राएलाचा पवित्र प्रभू असे म्हणतो, “तुमच्यासाठी मी बाबेलास निरोप पाठवला आहे; मी तेथील सर्व खास्द्यांना त्यांच्या अभिमानास्पद जहाजात बसून पळायला लावीन.


बाबेलचे पुरुष, सर्व खास्दी, पकोड, शोआ व कोआ येथले लोक व अश्शूरी पुरुष, जे सर्व मनोहर तरुण, अधिपती व नायब अधिपती, वीर व मंत्री व शिलेदार आहेत; त्यांना तुझ्यावर आणीन.


“मानवपुत्रा, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने सोरेस वेढा घातला तेव्हा त्याने आपल्या सैन्यास भारी कष्ट करायला लावले; सर्वांच्या डोक्यांना टक्कले पडली, खांद्यांची सालटी निघाली, तरी त्याने जो खटाटोप केला त्याचा त्याला किंवा त्याच्या सैन्याला योग्य मोबदला मिळाला नाही.


त्या वेळी राजा म्हणाला, “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!”


कारण, पाहा, मी खास्द्यांची उठावणी करतो; ते उग्र व उतावळे राष्ट्र आहे; जी स्थले त्यांची नाहीत त्यांचा ताबा घ्यावा म्हणून ते पृथ्वीवर फिरत असतात.


तेव्हा तो खास्द्यांच्या देशातून निघून हारानात जाऊन राहिला; मग त्याचा पिता मृत झाल्यावर देवाने त्याला तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan