Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 22:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मजबूत ठिकाणी बसेलली खुंटी ढळेल; ती कापली जाऊन खाली पडेल व तिच्यावरील भार छेदला जाईल;’ कारण परमेश्वर हे बोलला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, मग असे घडेल की, भिंतीत पक्का केलेला खिळा असतो तो शिळ्या जवळ ढिला होउन पडेल व जो भार तिच्यावर होता तो छेदला जाईल, कारण परमेश्वर हे बोलला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी मजबूतपणे ठोकलेली पाचर डळमळीत होईल; ती उचकटून जाईल व निखळून जमिनीवर पडेल, तिच्यावर आधारलेले सर्व ओझे खाली पडेल.” ही याहवेहची वाणी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 22:25
15 Iomraidhean Croise  

अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.


परंतु देव तुझा नाश करील; तो तुला धरून डेर्‍यातून खेचून काढील, व जिवंतांच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील. (सेला)


मजबूत ठिकाणच्या खुंटीसारखे मी त्याला स्थिर करीन; म्हणजे तो आपल्या पित्याच्या घराण्यास वैभवशाली आसन होईल.


त्याच्या पित्याच्या घराण्याच्या सर्व शाखा व प्रतिशाखा, पंचपात्रीपासून सुरईपर्यंत सगळी पात्रे, ह्यांचा भार त्याच्यावर लटकून राहील.


उगवतीकडून मी हिंस्र पक्षी बोलावतो, माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलावतो, मी बोललो तसे घडवूनही आणतो, मी योजतो ते शेवटास नेतो.


मी, केवळ मीच बोललो आहे; मी त्याला बोलावले आहे, त्याला आणले आहे. त्याचा आयुष्यक्रम सफल होईल.


ह्यामुळे पृथ्वी शोक करील, वर आकाश काळे होईल; कारण मी असे बोललो आहे, मी हे योजले आहे; मी अनुताप पावणार नाही; मी माघार घेणार नाही.”


अशी माझ्या रागाची पूर्तता होईल आणि त्यांच्यावरच्या माझ्या क्रोधाची तृप्ती होऊन माझे समाधान होईल. मी त्यांच्यावरच्या माझ्या क्रोधाचा शेवट केला म्हणजे ते समजतील, की मी परमेश्वर हे आवेशाने बोललो आहे.


मी क्रोधाने, संतापाने व तीव्र निषेधवाणीने तुझे न्यायशासन करीन. तेव्हा तुझ्याभोवतालच्या राष्ट्रांना तू अपशब्द, निंदा, ताकीद व विस्मय ह्यांचा विषय होशील; मी परमेश्वर हे म्हणालो आहे;


मी तुमच्यावर दुष्काळ व हिंस्र पशू पाठवीन; ते तुम्हांला नि:संतान करतील; मरी व रक्तपात तुमच्यावर येतील; मी तुमच्यावर तलवार आणीन; मी परमेश्वर हे म्हणालो आहे.”


ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांना घाबरवणार नाही; कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan