Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 22:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 हे गोंगाटाने भरलेल्या, गजबजलेल्या शहरा, उत्सवशब्द करणार्‍या नगरा, तुझ्यातील वध पावलेले तलवारीने वधले नाहीत, युद्धात मारले नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 एक गोंगाटाने भरलेले शहर, आंनदाने भरलेली नगरी, तुझ्यातील जे तलवारीने ठार केलेले नाहीत आणि जे युद्धात मारले गेले नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 हे गोंधळाने भरलेल्या नगरा, हे दंगा व चंगळबाजीने भरलेल्या शहरा, तुमचे वधलेले लोक तलवारीने मारले गेले नव्हते, ते युद्धातही मरण पावले नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 22:2
16 Iomraidhean Croise  

बंदिवानांच्या पायांशी दबून राहणे व वध झालेल्यांच्या खाली पडून राहणे ह्यांशिवाय त्यांना दुसरी गती नाही. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


हेच का तुमचे आनंदपूर्ण नगर? ते अति प्राचीन काळापासून वसलेले आहे; त्याचे पाय वसाहतीसाठी त्याला दूरदूर घेऊन गेले.


माझ्या लोकांच्या भूमीवर काटेकुसळे उगवतील; ह्या उल्लासी नगराच्या सर्व आनंदमय घरांवरही ती उगवतील.


कारण राजभुवन ओस होईल, गजबजलेले शहर सुने पडेल; टेकडी व टेहळणीचा बुरूज ही सदासर्वदा गुहा बनतील, तेथे रानगाढवांचे क्रीडास्थान व कळपांची चरण होईल.


म्हणून अश्शूराच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो, तो ह्या नगरापर्यंत येणार नाही; ह्यावर एकही बाण सोडणार नाही; तो ढाल घेऊन ह्याच्याशी सामना करणार नाही आणि ह्यावर मोर्चा रचणार नाही.


मग परमेश्वराच्या दिव्यदूताने जाऊन अश्शूरी गोटातल्या एक लक्ष पंचाऐंशी हजार लोकांना मारले; पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते!


मी वनात जातो तर पाहा, तेथे तलवारीने वधलेले आहेत! शहरात येतो तर दुष्काळाने पिडलेले मला आढळतात; कारण संदेष्टे व याजक हे अज्ञात देशात भटकत आहेत.”’


“परमेश्वर म्हणतो, जो ह्या नगरात राहील तो तलवारीने, दुष्काळाने व मरीने मरेल; पण जो खास्द्यांकडे जाईल तो जगेल, तो जिवानिशी सुटेल.


चौथ्या महिन्याच्या नवमीपासून नगरात एवढी महागाई झाली की देशाच्या लोकांना काही खाण्यास मिळेना.


हायहाय! लोकांनी गजबजलेली नगरी कशी एकान्तात बसली आहे! राष्ट्रांमध्ये जी थोर तिला कसे वैधव्य आले आहे! परगण्यांमध्ये जी राणी ती कशी करभार देणारी झाली आहे!


हे परमेश्वरा, पाहा, हे तू कोणाला केले ह्याचा विचार कर! स्त्रियांनी आपल्या पोटचे फळ, हातावर खेळवलेली आपली बालके खावीत काय? याजक व संदेष्टा ह्यांना प्रभूच्या पवित्रस्थानात जिवे मारावे काय?


‘तू अभद्र नावाची व बेबंदपणाने भरलेली नगरी आहेस’ असे म्हणून जवळचे व दूरचे तुझा उपहास करतील.


हीच ती उल्लासी, निर्धास्त असलेली नगरी! ती आपल्या मनात म्हणत असे की मीच काय ती आहे, दुसरे कोणी नाही; ती कशी ओसाड, पशू बसण्याची जागा झाली आहे! तिच्याजवळून जाणारा प्रत्येक जण तिची छीथू करील व तिच्याकडे हातवारे करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan