Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 22:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 येथे तुझे काय आहे? येथे तुझे कोण आहे? तू आपल्यासाठी थडगे खोदवले आहेस; उच्च स्थळी थडगे खोदवले आहेस; खडक कोरून तू आपणासाठी जागा केली आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तू येथे काय करीत आहेस? तू कोण आहेस? जसा कोणी आपली कबर उंच ठिकाणांत खोदतो आणि आपले राहण्याचे स्थान खडकामध्ये करतो तशी तू आपणासाठी कबर खोदीत आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तुम्ही इथे काय करत आहात आणि या दगडातून स्वतःसाठी कबर कापण्याची उंचीवर तुमची कबर कोरण्याची, आणि या खडकात तुमची विश्रांतीची जागा तयार करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 22:16
10 Iomraidhean Croise  

माझ्या बापाने माझ्याकडून आणभाक घेऊन म्हटले की, ‘पाहा, मी आता मरणार; तर कनान देशात जी कबर मी आपल्यासाठी खोदवून घेतली आहे तिच्यात मला नेऊन मूठमाती दे.’ मला तिकडे जाऊन माझ्या बापाला पुरू द्यावे. मी परत येईन.”


आपले नाव चालवण्यास कोणी पुत्र नाही हे लक्षात घेऊन अबशालोमाने आपल्या हयातीत एक मनोरा उभारला होता, तो राजाच्या खोर्‍यात आहे. त्या मनोर्‍याला त्याने आपले नाव दिले; आजपर्यंत त्याला अबशालोमाचा स्मारकस्तंभ म्हणत आले आहेत.


दावीदपुरात जे थडगे त्याने खोदवले होते त्यात त्याला मूठमाती दिली आणि सुवासिक द्रव्ये आणि गांध्यांनी केलेले तर्‍हेतर्‍हेचे मसाले ह्यांनी भरलेल्या बिछान्यावर त्याला त्यांनी निजवले व त्याच्याप्रीत्यर्थ त्यांनी बहुत सुवासिक द्रव्ये जाळली.


आपणासाठी शून्य मंदिरे बांधणारे भूपती व मंत्री ह्यांच्याबरोबर,


राष्ट्रांचे राजे सगळे आपापल्या घरी गौरवाने निद्रिस्त आहेत;


पण तुला फेकून दिलेल्या फांदीप्रमाणे आपल्या थडग्यापासून दूर झुगारून दिले आहे; वधलेले, तलवारीने विंधलेले, गर्तेच्या धोंड्यामध्ये पडलेले ह्यांनी तू वेष्टला आहेस. पायांखाली तुडवलेल्या मढ्यासारखा तू झाला आहेस.


पाहा, परमेश्वर तुला बलवान पुरुषाप्रमाणे झुगारून देणार आहे; तुला मगरमिठीत धरणार आहे.


परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांना फुकट धरून नेले आहे, आणि आता मी येथे काय करू? परमेश्वर म्हणतो, त्यांच्यावर प्रभूत्व करणारे गर्जना करीत आहेत, दिवसभर एकसारखी माझ्या नामाची निंदा होत आहे.


उठा, चालते व्हा, हे तुमचे विश्रांतिस्थान नव्हे; कारण अशुद्धतेने नाश, समूळ नाश होईल.


ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले, एक मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लावली आणि तो निघून गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan