Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 22:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 पण पाहावे तर आनंद व हर्ष, बैल मारणे व मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षारस पिणे चालले आहे; “उद्या मरायचे आहे म्हणून खाऊनपिऊन घेऊ या,” असे ते म्हणत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 परंतू त्याऐवजी, पाहा, उत्सव आणि हर्ष, बैल मारणे, मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षरस पिणे चालले आहे. आपण खाऊ व पिऊ, कारण उद्या आपल्याला मरायचेच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 परंतु पाहा, तिथे आनंद आणि चंगळ आहे, गुरांची कत्तल आणि मेंढरांची हत्या, मांस खाणे आणि द्राक्षारस पिणे! तुम्ही म्हणता, “चला, आपण खाऊ आणि पिऊ, कारण उद्या आपण मरणार आहोत!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 22:13
16 Iomraidhean Croise  

दुर्जनांवर कृपा केली तरी तो नीती शिकायचा नाही; सरळांच्या राज्यातदेखील तो अधर्म करील; परमेश्वराचे ऐश्वर्य त्याला दिसायचे नाही.


अरीएल1 ह्याला धिक्कार असो! दाविदाने तळ दिलेले अरीएल नगर ह्याला धिक्कार असो! ह्या वर्षात आणखी एक वर्ष मिळवा, सणांचा एक फेरा होऊ द्या.


अगे विलासिनी, जी तू निश्‍चिंत बसतेस व मनात म्हणतेस, “मीच आहे, माझ्यावेगळी कोणी नाही, मी विधवा होणार नाही, अपत्यहीनतेचा अनुभव मला घडणार नाही,” ती तू हे ऐक :


जे पहाटेस उठून मद्याच्या पाठीस लागतात, जे अपरात्रीपर्यंत द्राक्षारस पिऊन धुंद होतात त्यांना धिक्कार असो.


वीणा, सारंगी, डफ, बासरी व द्राक्षारस हीच त्यांची मेजवानी; पण ते परमेश्वराच्या कृतीकडे लक्ष देत नाहीत, ते त्याच्या हातचे कार्य पाहत नाहीत.


ज्यांचे शौर्य द्राक्षारस पिण्यात आणि ज्यांची बहादुरी मद्य मिसळण्यात


ते म्हणतात, “चला, या, मी द्राक्षारस घेऊन येतो; आपण मद्याने मस्त होऊ; आजच्यासारखा उद्याचा दिवस होईल, तो अतिशय चैनीचा होईल.”


‘आम्ही उपास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जिवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस?’ “पाहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाडकष्ट करवता.


पाहा, तुझी बहीण सदोम हिचे पाप येणेप्रमाणे होते : गर्व, अन्नाची विपुलता व ऐषआराम ही तिला व तिच्या कन्यांना होती; दरिद्री व गरजवंत ह्यांना तिने हात दिला नाही.


हे इस्राएला, इतर राष्ट्रांप्रमाणे आनंदाने उल्लासू नकोस, कारण तू व्यभिचार करून आपल्या देवाला सोडले आहेस; प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराची कमाई तुला आवडली आहे.


मनुष्यस्वभावाप्रमाणे म्हणायचे तर इफिसात मी श्वापदांबरोबर लढाई केली ह्यात मला काय लाभ? मेलेले उठवले जात नाहीत, “तर चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या मरायचे आहे.”


तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला; ‘वधाच्या दिवशी’ तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan