Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 21:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तर पाहा, पायदळ, जोडीजोडीने चालणारे घोडेस्वार येत आहेत; ते उच्च स्वराने म्हणतात, बाबेल पडला हो पडला; त्याच्या देवांच्या सर्व मूर्ती जमिनीवर आपटून फोडल्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आणि जोडी जोडीने चालणाऱ्या घोडस्वारांचे एक सैन्य येत आहे. त्याने म्हटले, बाबेल पडली, पडली, आणि तिच्या सर्व कोरीव देव मूर्तींचा पूर्ण पणे नाश होऊन ते जमिनीस मिळाल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 पाहा, एक मनुष्य रथात स्वार होऊन घोड्याच्या ताफ्याबरोबर इकडे येत आहे. आणि तो प्रत्युत्तर देत आहे: ‘बाबेल पडले आहे, ते पडले आहे! तिथे असलेल्या तिच्या दैवतांच्या सर्व मूर्तींचे तुकडे होऊन जमिनीवर पडले आहेत!’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 21:9
22 Iomraidhean Croise  

तेव्हा राष्ट्रांचा मुकुटमणी, खास्दी लोकांच्या ऐश्वर्याचे भूषण असा जो बाबेल त्याची, सदोम व गमोरा ह्यांचा देवाने सत्यानाश केला तेव्हाच्यासारखी स्थिती होईल.


त्या दिवशी असे होईल की बाबेलच्या राजासंबंधाने हे कवन तू म्हणशील : “पिडणारा कसा नाहीसा झाला! पिळून काढणारी नगरी कशी नष्ट झाली आहे!


मूर्ती तर अगदी नाहीतशा होतील.


रथ, जोडीजोडीने चालणारे घोडेस्वार, गाढवांवर बसलेले स्वार व सांडणीस्वार हे त्याच्या दृष्टीस पडले तेव्हा त्याने अतिशय उत्कंठेने कान लावले.


अगे खास्द्यांच्या कन्ये, गप्प बस, अंधारात जाऊन लप; कारण लोक ह्यापुढे तुला राज्यांची स्वामिनी म्हणणार नाहीत.


अपत्यहीनता व वैधव्य ही दोन्ही एकाच दिवशी, एकाच क्षणी तुला प्राप्त होतील; तुझे बहुविध मंत्रतंत्र व तुझी विपुल चेटके ह्यांना न जुमानता ती तुझ्यावर पूर्णपणे गुदरतील.


तुम्ही सर्व जमा व्हा, ऐका; त्या मूर्तींपैकी कोणी ह्या गोष्टी कळवल्या? परमेश्वराला प्रिय असलेला मनुष्य आपल्या इच्छेप्रमाणे बाबेलचे करील; तो आपले भुजबल खास्द्यांवर चालवील.


बाबेलवर तिरंदाज, सर्व धनुर्धारी ह्यांना जमवा; त्याच्या सभोवती तळ द्या; त्याचा काही निभाव लागू देऊ नका; त्याच्या कृतीप्रमाणे त्याला प्रतिफळ द्या; जे सर्व त्याने केले तसे त्याला करा; कारण त्याने परमेश्वराविरुद्ध, इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरुद्ध तोरा मिरवला आहे.


त्याच्या जलप्रवाहांना झळ लागेल व ते सुकून जातील; कारण तो देश कोरीव मूर्तींचा आहे, त्यातील लोकांना मूर्तींचे वेड लागले आहे.


ते धनुष्य व भाले धारण करतात, ते क्रूर आहेत, त्यांना दयामाया नाही; ते सागराप्रमाणे गर्जना करतात, ते घोड्यांवर स्वार झाले आहेत. हे बाबेलकन्ये, ते युद्धास सिद्ध झाल्याप्रमाणे तुझ्यावर येत आहेत.


कारण पाहा, मी उत्तर देशाहून मोठ्या राष्ट्रांचा जमाव उठवून बाबेलवर आणीन; ते त्याच्याविरुद्ध सज्ज होतील; त्याच दिशेकडून तो हस्तगत होईल; रिकामा परत येत नाही अशा चतुर वीराच्या बाणांप्रमाणे त्यांचे बाण आहेत.


पृथ्वीवर ध्वज उभारा, राष्ट्रांमध्ये रणशिंग वाजवा, त्याच्याविरुद्ध राष्ट्रे सिद्ध करा, अराराट, मिन्नी व आष्कनाज ह्या राज्यांना त्याच्यावर चढाई करण्यास बोलवा; त्याच्याविरुद्ध सेनापतींची नेमणूक करा; विक्राळ टोळांप्रमाणे घोडे येऊ द्या.


मी बेल दैवताचा बाबेलात समाचार घेईन, त्याने गिळले ते त्याच्या तोंडावाटे मी काढीन, राष्ट्रांचा ओघ त्याच्याकडे वाहणार नाही; बाबेलचा तटही पडेल.


ह्यास्तव पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी बाबेलच्या कोरीव मूर्तींचा समाचार घेईन; त्याचा सर्व प्रदेश लज्जित होईल, त्याचे सर्व लोक त्याच्यात ठार होऊन पडतील.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी तिच्या कोरीव मूर्तीचा समाचार घेईन, तिच्या सर्व देशभर घायाळ झालेले कण्हत पडतील.


असे करून म्हण की, ‘ह्याच प्रकारे मी बाबेलवर जे अरिष्ट आणणार त्यामुळे तो बुडेल, वर येणार नाही; ते व्यर्थ शिणतील.”’ येथवर यिर्मयाची वचने आहेत.


बाबेल एकाएकी पडून भंगला आहे; त्याबद्दल हायहाय करा; त्याच्या जखमेसाठी मलम घेऊन जा, त्याला गुण येईल.


त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला, “‘पडली, मोठी बाबेल पडली, तिने आपल्या’ जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे.”’


तो जोरदार वाणीने म्हणाला, “‘पडली, मोठी बाबेल पडली;’ ती ‘भुतांची वस्ती’ व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे.


नंतर एका बलवान देवदूताने जात्याच्या एका मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला ‘आणि’ तो समुद्रात ‘भिरकावून म्हटले, “‘अशीच’ ती ‘मोठी’ नगरी ‘बाबेल’ झपाट्याने टाकली जाईल ‘व ह्यापुढे कधीही सापडणार नाही;”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan