Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 21:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तो सिंहनाद करून म्हणाला, “प्रभू, मी दिवसा बुरुजावर एकसारखा उभा असतो, रात्रीच्या रात्री आपल्या चौकीवर काढतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 पहारेकरी सिंहनाद करून म्हणाला, हे प्रभू, पाहाऱ्याच्या बुरूजावर मी रोज दिवसभर उभा असतो आणि पूर्ण रात्र मी आपल्या चौकीवर उभा राहतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 त्याप्रमाणे तटावर ठेवलेला पहारेकरी सिंहगर्जना करीत ओरडला, “महाराज, मी दिवसेंदिवस, रात्रीच्या रात्री येथे पहारा करीत राहिलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 21:8
12 Iomraidhean Croise  

रानातील टेहळणीच्या बुरुजानजीक यहूदी लोकांनी येऊन त्या समुदायाकडे दृष्टी फेकली तेव्हा चोहोकडे जमिनीवर प्रेतेच प्रेते पडली आहेत, कोणी निभावला नाही असे त्यांना दिसून आले.


परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत; परमेश्वर जर नगर रक्षत नाही तर पहारेकर्‍यांचे जागरण व्यर्थ आहे.


मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्मरण करतो, व प्रहरोप्रहरी तुझे ध्यान करीत असतो.


ते सिंहासारखी गर्जना करीत आहेत; ते तरुण सिंहाप्रमाणे गुरगुरत आहेत व गुरगुरून शिकार पकडत आहेत; ते ती घेऊन जात आहेत, कोणी सोडवत नाहीत.


त्याचे जागल्ये आंधळे आहेत, ते सगळे ज्ञानशून्य आहेत; ते सगळे मुके कुत्रे आहेत, त्यांना भुंकता येत नाही; ते बरळणारे, पडून राहणारे, निद्राप्रिय असे आहेत.


हे यरुशलेमा, मी तुझ्या कोटावर पहारेकरी नेमले आहेत; ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत; अहो परमेश्वराला स्मरण देणार्‍यांनो, तुम्ही स्वस्थ राहू नका;


तरुण सिंहाप्रमाणे त्याने आपली जाळी सोडली आहे; क्लेश देणार्‍या तलवारीने व त्याच्या क्रोधाच्या संतापाने त्यांचा देश उजाड झाला आहे.”


सिंह आपल्या झाडीतून बाहेर निघाला आहे; राष्ट्रांना फस्त करणारा वाट चालत आहे, तुझा देश ओस करण्यासाठी, तुझी नगरे उजाड, निर्जन करण्यासाठी तो आपल्या स्थानातून निघाला आहे;


पाहा, तो यार्देनेच्या घोर अरण्यामधून येणार्‍या सिंहाप्रमाणे त्या मजबूत वस्तीवर येईल; मी अदोमास त्या वस्तीपासून एका क्षणात पळवीन, व ज्याला निवडतील त्याला तिच्यावर नेमीन; कारण माझ्यासमान कोण आहे? मला न्यायसभेसमोर कोण आणील? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील?


पाहा, यार्देनेच्या घोर अरण्यातून जसा सिंह तसा तो त्या मजबूत वस्तीवर येईल; पण मी त्यांना त्या वस्तीपासून एका क्षणात पळवीन; ज्याला निवडतील त्याला तिच्यावर नेमीन; कारण माझ्यासमान कोण आहे? मला न्यायसभेसमोर कोण आणील? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील?


सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan