Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 21:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 हे माझ्या झोडलेल्या आणि खळ्यातल्या धान्या, इस्राएलाचा देव, सेनाधीश परमेश्वर, ह्याच्याकडून जे मी ऐकले ते मी तुम्हांला कळवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 हे माझ्या मळणी केलेल्या आणि खळ्यांतील धान्या! माझ्या खळ्यातील लेकरा! सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, ह्याकडून जे काही मी ऐकले, ते तुम्हास घोषीत केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 माझे लोक जे खळ्यावर चिरडले गेले आहेत, इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह यांच्याकडून, मी जे ऐकले आहे ते मी तुम्हाला सांगतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 21:10
13 Iomraidhean Croise  

मीखाया म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वर जे काही मला सांगेल तेच मी बोलेन.”


अरामाच्या राजाने यहोआहाजाच्या सेनेत केवळ पन्नास स्वार, दहा रथ व दहा हजार पायदळ एवढेच राहू दिले होते व बाकीच्यांचा नाश करून त्यांना तुडवून धुळीस मिळवले होते.


भाकरीच्या धान्याचा तो भुगा करतो काय? नाही. तो त्याची मळणी सतत चालवत नाही, तो आपल्या गाडीचे चाक व घोडे त्यावर सतत घालत नाही, तो त्याचा भुगा करत नाही.


कोणा संदेष्ट्याने स्वप्न पाहिले असेल तर ते तो कथन करो; माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो ते माझे वचन सांगो. गव्हापुढे पेंढा तो काय? असे परमेश्वर म्हणतो.


कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, धान्य मळण्याच्या वेळी खळे असते तशी बाबेलकन्या आहे; अजून थोडा अवधी आहे म्हणजे मग तिचा हंगाम येईल.


तो पुरुष मला म्हणाला, “मानवपुत्रा, आपल्या डोळ्यांनी पाहा, आपल्या कानांनी ऐक, व मी तुला जे काही दाखवतो त्या सर्वांकडे चित्त लाव; हे तुला दाखवावे म्हणून मी तुला इकडे आणले आहे; तू जे पाहशील ते सर्व इस्राएल घराण्यास सांग.”


सिंहाने गर्जना केली आहे; त्याला भिणार नाही असा कोण? प्रभू परमेश्वर बोलला आहे; संदेश दिल्यावाचून कोणाच्याने राहवेल?”


सीयोनकन्ये, ऊठ, मळणी कर; मी तुझे शिंग लोखंडासारखे व तुझे खूर पितळेसारखे करतो; तू अनेक राष्ट्रांचा चुराडा करशील, त्यांची कमाई परमेश्वराला वाहशील, त्यांची संपत्ती सकल पृथ्वीच्या प्रभूला तू वाहशील.


तू संतापून पृथ्वीवर चालतोस, तू आपल्या क्रोधाने राष्ट्रांना तुडवून टाकतोस,


त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझत्या अग्नीने जाळून टाकील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan