Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 21:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 समुद्रालगतच्या रानाविषयीची देव वाणी : दक्षिणेकडून जशा वावटळी झपाट्याने येतात, तसे रानातून, भयानक देशातून अरिष्ट येते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 समुद्राजवळच्या राणाविषयी ही देववाणी. जसा दक्षिणेचा वादळवारा सर्व काही खरडून नेतो त्याप्रकारे तो रानांतून, भयंकर देशातून येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 समुद्राकाठी असलेल्या वाळवंटी प्रदेशाविरुद्ध भविष्यवाणी: ज्याप्रकारे वावटळ दक्षिणेकडील प्रदेशांना झाडून जाते, त्याच प्रकारे हल्ला करणारा वाळवंटी प्रदेशातून, दहशती भूमीमधून येतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 21:1
21 Iomraidhean Croise  

वावटळ दक्षिणेकडून येते. उत्तरेकडील वार्‍यांमुळे थंडी येते.


बाबेलविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला दृष्टान्तात प्राप्त झालेली देववाणी :


मी आकाश कंपायमान करीन व पृथ्वी स्थानभ्रष्ट होईल; सेनाधीश परमेश्वराचा कोप व त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस ह्यांमुळे असे होईल.


कारण याकोबावर परमेश्वर दया करील; तो पुन्हा इस्राएलास निवडून घेईल, त्यांना त्यांच्या स्वदेशात वसवील; त्यांना परके येऊन मिळतील; ते याकोबाच्या घराण्याशी लगटून राहतील.


मी मेघांवर आरोहण करीन, मी परात्परासमान होईन;’


तो साळूचे वतन व पाणथळ होईल असेही मी करीन; नाशरूप झाडूने मी त्यास झाडून टाकीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.”


दिमिष्काविषयीची देववाणी : पाहा, दिमिष्क हे नगर ह्या नावाला मुकले आहे; ते मोडतोडीचा ढीग बनले आहे.


अगे बाबेलच्या कुमारिके, खाली उतरून धुळीत बस; खास्द्यांच्या कन्ये, सिंहासन सोडून भूमीवर बस, कारण तुला ह्यापुढे नाजूक व सुकुमार म्हणणार नाहीत.


त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत, त्यांची धनुष्ये सज्ज केली आहेत; त्यांच्या घोड्यांचे खूर गारेसारखे, त्यांची चाके वावटळीसारखी आहेत.


परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी बाबेलवर व लेब-कामाईच्या1 रहिवाशांवर एका विध्वंसकाच्या मनास प्रवृत्त करीत आहे.


समुद्र बाबेलवर लोटला आहे; त्याच्या लाटांच्या समुदायाने तो झाकून गेला आहे.


‘निंदा आमच्या कानी पडली म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत; परमेश्वराच्या मंदिरातल्या पवित्रस्थानात परके आले आहेत; म्हणून लज्जेने आमची मुखे व्याप्त झाली आहेत.’


मी पाहिले तो उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तेव्हा एक विशाल मेघ येत असून त्यामध्ये लपेटलेला एक अग्निगोल होता; त्याभोवती प्रभा फाकली असून अग्नीच्या मध्यभागातून तृणमण्याच्यासारखे तेज झळकत होते.


तो व सर्व लोकांमध्ये भयंकर असे त्याचे लोक ह्यांना ह्या देशाचा नाश करायला आणीन; ते मिसरावर आपल्या तलवारी उपसून वधलेल्या मनुष्यांनी सर्व देश भरून टाकतील.


अन्य राष्ट्रांतल्या भयंकर परक्या लोकांनी त्याला छेदून टाकले व फेकून दिले : त्याच्या डाहळ्या पर्वतांवर व सर्व खोर्‍यांत पडल्या आहेत; देशातल्या सर्व नाल्यानाल्यांतून त्याच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे त्याच्या छायेतून गेली आहेत; त्यांनी त्याला सोडले आहे.


तू तुफानासारखा चालून येशील, भूमीला मेघ झाकतो त्यासारखा तू होशील; तू, तुझे सर्व सेनासमूह व तुझ्यासह अनेक राष्ट्रांचे लोक असे तुम्ही सर्व याल.


अंतसमयी दक्षिणेचा राजा त्याला टक्कर देईल; उत्तरेचा राजा रथ, स्वार व पुष्कळ तारवे घेऊन वावटळीसारखा त्याच्यावर येईल; तो अनेक देशात शिरेल व त्यांना पादाक्रांत करून पार निघून जाईल.


त्यांच्यावरती परमेश्वर दृष्टीस पडेल, त्याचे बाण विद्युल्लतेसारखे सुटतील; प्रभू परमेश्वर रणशिंग फुंकील व दक्षिणेकडच्या वावटळीत कूच करील;


Lean sinn:

Sanasan


Sanasan