Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 20:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्या दिवशी ह्या समुद्रतीरीचे रहिवासी म्हणतील, ‘पाहा, अश्शूरच्या राजापासून आम्हांला सोडवावे म्हणून आम्ही ज्याची अपेक्षा केली, ज्याच्याकडे आम्ही साहाय्यार्थ धावलो त्याची अशी गत झाली; मग आमचा निभाव कसा लागेल?”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्या दिवशी या समुद्रकिनाऱ्यावरील राहणारे लोक म्हणतील, “खरोखर, हा आमच्या आशेचा स्त्रोत, ज्याच्याकडे साहाय्यासाठी व अश्शूराच्या राजापासून रक्षण करण्यासाठी आम्ही पळालो तो असा आहे, तर आम्ही कसे सुटून जाऊ?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्या दिवशी या किनार्‍यावर राहणारे लोक असे म्हणतील की, ‘ज्यांच्यावर आम्ही विसंबून होतो, पहा हे त्यांचे काय झाले आहे. ज्यांच्याकडे आम्ही मदतीसाठी आणि अश्शूरच्या राजापासून आमची सुटका व्हावी यासाठी धाव घेतली होती, तर आता आमची सुटका कशी होईल?’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 20:6
16 Iomraidhean Croise  

जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवतो; तुझ्या हातांच्या निर्मलतेमुळे त्याचा बचाव होईल.”


पण त्यांच्या आशेची निराशा झाली; तेथे पोचून ते फजीत झाले.


पारिपत्याच्या दिवशी व दुरून नाशकारक वादळ येईल तेव्हा काय कराल? तुम्ही साहाय्यार्थ कोणाकडे धाव घ्याल? आपले ऐश्वर्य कोठे ठेवून जाल?


न्याय ही दोरी व नीतिमत्ता हा ओळंबा असे मी करीन; लबाडीचा आश्रय गारांनी वाहून जाईल, व दडण्याची जागा जलाचे ओघ बुडवून टाकतील.”


परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे :


हायहाय! तो महादिन आहे; त्याच्यासमान दुसरा कोणता नाही; तो याकोबाचा क्लेशसमय आहे तरी त्यातून त्याचा निभाव होईल.


परमेश्वर म्हणतो, “त्या काळी मी इस्राएलाच्या सर्व वंशांचा देव होईन व ते माझे लोक होतील.”


हे लुटलेले, तू काय करशील? तू जांभळे वस्त्र नेसलीस, सोन्याच्या अलंकारांनी भूषित झालीस, काजळ घालून आपले डोळे मोठे केलेस, तरी तुझी सुरेख दिसण्याची खटपट व्यर्थ आहे; तुझे जार तुला तुच्छ मानतात, ते तुझ्या प्राणावर टपत आहेत.


पलिष्ट्यांच्या नाशाचा दिवस येत आहे; सोर व सीदोन ह्यांना साहाय्य करणारा जो कोणी उरला असेल त्याचा उच्छेद होईल; परमेश्वर पलिष्ट्यांचा म्हणजे कफतोर द्वीपांतील अवशिष्ट लोकांचा नाश करणार आहे.


अहो सापांनो, सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल?


“शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.


तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल? ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून, ते ऐकणार्‍यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटवले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan