Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 20:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्या वेळी आमोजाचा पुत्र यशया ह्याच्या द्वारे परमेश्वर म्हणाला : “जा, आपल्या कंबरेचे गोणपाट सोडून टाक, आपल्या पायातला जोडा काढ.” त्याने तसे केले; तो उघडा व अनवाणी चालला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्या वेळेला आमोजाचा मुलगा यशयाशी परमेश्वर बोलला आणि म्हणाला, “जा व तुझ्या कंबरे पासूनचे गोणपाटाचे वस्त्र काढून टाक व तुझ्या पायातील जोडे काढ.” त्याने तसे केले, तो नग्न व अनवाणी चालला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्यावेळेस आमोजचा पुत्र यशायाहद्वारे याहवेह बोलले. ते त्याला म्हणाले, “तुझ्या अंगावरील गोणपाट आणि पायातील चपला काढून टाक.” आणि त्याने तसे केले, वस्त्रहीन आणि अनवाणी असा तो फिरत राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 20:2
27 Iomraidhean Croise  

दावीद जैतून पर्वताचा चढाव चढून गेला; तो रडत रडत वर चढून गेला; आपले मस्तक झाकून तो अनवाणी चालला; त्याच्याबरोबरची सर्व माणसे आपली मस्तके झाकून रडत रडत वर चढून गेली.


आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला. तेव्हा शौलाची कन्या मीखल दाविदाला भेटायला बाहेर आली व त्याला म्हणू लागली, “एखादा हलकट मनुष्य उघडाबोडका होतो तसे आज इस्राएलाच्या महाराजांनी आपले दास व दासी ह्यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्राएलाचे महाराज किती वैभवशाली दिसले!”


ते म्हणाले, “त्याच्या अंगात केसांचा झगा होता व त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद होता.” तो म्हणाला, “तो एलीया तिश्बीच.”


तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस; तू माझे गोणताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहेस;


देव त्याला म्हणाला, “इकडे जवळ येऊ नकोस; तू आपल्या पायांतले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे.”


यहूदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या काळात यहूदा व यरुशलेम ह्यांविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला झालेला दृष्टान्त.


बाबेलविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला दृष्टान्तात प्राप्त झालेली देववाणी :


तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना व याजकांपैकी वडील ह्यांना गोणपाट नेसलेले असे त्याने आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा ह्याच्याकडे पाठवले.


प्रत्येक डोके भादरले आहे; प्रत्येक दाढी मुंडली आहे; सर्वांच्या हातांवर घाव आहेत, कंबरांना गोणपाट आहे.


उसासा मुकाट्याने टाक; मृतांसाठी शोक करू नकोस, डोक्याला शिरोभूषण घाल, पायांत जोडा घाल, आपले ओठ झाकू नकोस, सुतकात लोक अन्न पाठवतात ते खाऊ नकोस.”


तुम्ही आपल्या डोक्यांस शिरोभूषणे घालाल, पायांत जोडे घालाल; तुम्ही शोक करणार नाही, रडणार नाही, तर आपल्या अधर्माने झुराल व एकमेकांना पाहून उसासे टाकाल.


हे मानवपुत्रा, एक वीट घेऊन आपल्यासमोर मांड; तिच्यावर यरुशलेम नगरीचे चित्र काढ.


कारण त्यांच्या अधर्माच्या वर्षांइतके दिवस मी तुझ्या हिशोबी गणले आहेत; तीनशे नव्वद दिवस तुला इस्राएल घराण्याचा भार वाहायचा आहे.


शाफीरच्या (सुंदर नगराच्या) रहिवासिणी, नग्न होऊन, लज्जा सोडून चालती हो; सअनानाची रहिवासीण बाहेर निघाली नाही; बेथ-एसलाचा शोक हा तुमच्या विपत्तीचा शेवट नाही.


ह्यास्तव मी शोक व आक्रंदन करीन. मी उघडानागडा फिरेन, मी कोल्ह्यांसारखा ओरडेन व शहामृगांसारखा विव्हळेन.


त्या दिवशी असे होईल की, संदेष्टा संदेश वदताना आपल्या प्रत्येक दृष्टान्तासंबंधाने लज्जित होईल व लोकांना फसवण्यासाठी केसांचा झगा घालणार नाही;


मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.


ह्या योहानाचे वस्त्र उंटांच्या केसांचे होते, त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद होता, आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता.


ह्यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “हा प्रभूच आहे.” “प्रभू आहे” हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कंबरेला गुंडाळून घेतला, (कारण तो उघडा होता) आणि त्याने समुद्रात उडी टाकली.


मग ज्या माणसाला दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी घालून दोघांना हटवले आणि त्यांच्यावर इतकी जरब बसवली की ते त्या घरातून घायाळ व उघडेनागडे होऊन पळून गेले.


त्याने आमच्याकडे येऊन व पौलाचा कमरबंद घेऊन आपले हातपाय बांधून म्हटले, “पवित्र आत्मा असे म्हणतो की, ‘हा कमरबंद ज्या माणसाचा आहे त्याला यरुशलेमेत यहूदी लोक ह्याप्रमाणे बांधून परराष्ट्रीयांच्या हाती देतील.”’


परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, “आपल्या पायांतले जोडे काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे.” तेव्हा यहोशवाने तसे केले.


माझे दोन साक्षी ह्यांना मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून एक हजार दोनशे साठ दिवस संदेश सांगतील.”


तो आपली वस्त्रे फेडून शमुवेलापुढे भाषण करू लागला, व अहोरात्र जमिनीवर उघडा पडून राहिला. ह्यावरून ’शौलही संदेष्ट्यांपैकीच आहे काय?’ अशी म्हण पडली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan