Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 20:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 अश्शूर देशाचा राजा सर्गोन ह्याने पाठवल्यावरून तर्तान अश्दोद येथे आला, व त्याने अश्दोदाशी लढून ते हस्तगत केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 ज्या वर्षी सेनापती तर्तान अश्दोदास आला, म्हणजे जेव्हा अश्शूराचा राजा सर्गोन याने त्यास पाठवले, त्याने अश्दोदाविरूद्ध लढाई करून ते घेतले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 ज्या वर्षी अश्शूरचा राजा सार्गोनने पाठविलेला सर्वोच्च सेनापती अश्दोदला आला आणि त्याने हल्ला केला आणि ते ताब्यात घेतले—

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 20:1
9 Iomraidhean Croise  

एवढ्यावरही अश्शूराच्या राजाने तर्तान, रब-सारीस व रब-शाके (उच्चाधिकारी) ह्यांना मोठ्या सैन्यानिशी लाखीशाहून यरुशलेमेस हिज्कीयाकडे पाठवले. ते यरुशलेमेला जाऊन परटाच्या शेताजवळच्या वरच्या तळ्याच्या नळानजीक येऊन ठेपले.


त्याने जाऊन पलिष्ट्यांशी युद्ध केले; गथ, यन्नो व अश्दोद ह्यांचे कोट पाडून टाकले आणि अश्दोदाच्या आसपास व पलिष्ट्यांमध्ये त्याने नगरे वसवली.


अगे वेशी, हायहाय कर; अगे नगरी, ओरड; हे पलेशेथा, तू सर्वस्वी वितळून जाशील; कारण उत्तरेकडून धूर येत आहे; त्याच्या सैन्यापैकी कोणी चुकून मागे राहणार नाही.”


सर्व मिश्र जातींना, ऊस देशातील सर्व राजांना आणि पलिष्टी देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन व अश्दोदाचे अवशेष ह्यांच्या सर्व राजांना,


मी अश्दोदातील सिंहासनारूढ असलेला व अश्कलोनचा राजवेत्रधारी ह्यांचा निःपात करीन; एक्रोनावर माझा हात चालवीन व पलिष्ट्यांचा निःशेष नाश होईल,” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


इस्राएल लोकांच्या देशात एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गथ व अश्दोद ह्यांतले थोडे उरले.


पलिष्ट्यांनी देवाचा कोश घेतला तो एबन-एजर येथून अश्दोद येथे नेला.


पलिष्ट्यांनी परमेश्वरास दोषार्पण म्हणून ज्या ग्रंथींच्या सुवर्णप्रतिमा पाठवल्या त्या अश्दोदासाठी एक, गज्जासाठी एक, अष्कलोनासाठी एक, गथासाठी एक व एक्रोनासाठी एक अशा होत्या;


Lean sinn:

Sanasan


Sanasan