Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 2:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील, देशोदेशींच्या बहुत लोकांचा इन्साफ करील; तेव्हा ते आपल्या तलवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील; ह्यापुढे एक राष्ट्र दुसर्‍या राष्ट्रावर तलवार उचलणार नाही; ते इत:पर युद्धकला शिकणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तो राष्ट्रांमध्ये न्याय करील व अनेक लोकांबद्दल निर्णय देईल, ते आपल्या तलवारी मोडून त्याचे फाळ बनवतील व आपल्या भाल्यांचे कोयते करतील, यानंतर राष्ट्र राष्ट्रांवर तलवार उगारणार नाही किंवा युद्धकला सुद्धा अवगत करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ते राष्ट्रांमध्ये न्याय करतील, आणि अनेक लोकांमधील वाद मिटवतील. ते आपल्या तलवारी ठोकून त्यांचे नांगराचे फाळ करतील, व भाल्यांचे आकडे बनवतील. एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध तलवार उगारणार नाही, तसेच ते यापुढे लष्करी प्रशिक्षण देणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 2:4
26 Iomraidhean Croise  

तो राष्ट्रांमध्ये न्यायनिवाडा करील; रणभूमी प्रेतांनी भरील; चोहोकडे मस्तके फोडील.


“शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे, राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल.”


तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो; तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो; रथ अग्नीत जाळून टाकतो.


हे देवा, ऊठ, पृथ्वीचा न्याय कर; कारण तूच सर्व राष्ट्रांचा मालक आहेस.


कारण तो आला आहे; पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे; तो न्यायीपणाने जगाचा व सत्यतेने लोकांचा न्याय करील.


नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फल सर्वकाळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल.


आणि माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील.


कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्वर आमचा नियंता आहे, परमेश्वर आमचा राजा आहे; तो आम्हांला तारील.


पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी आधार आहे; पाहा, हा माझा निवडलेला, ह्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; ह्याच्या ठायी मी आपला आत्मा घातला आहे; तो राष्ट्रांना न्याय प्राप्त करून देईल.


चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझवणार नाही; तो सत्याने न्याय पुढे आणील.


युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सरपण झाली आहेत.


त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.


त्या दिवशी इस्राएलांकरता मी वनपशू, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव ह्यांबरोबर करार करीन; देशातून धनुष्य, तलवार व युद्ध मोडून टाकीन व ते सुखासमाधानाने राहतील असे मी करीन.


मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन व तू परमेश्वराला ओळखशील.


तुमचे फाळ ठोकून त्यांच्या तलवारी बनवा, आपल्या कोयत्यांचे भाले बनवा; “मी वीर आहे” असे अशक्तही म्हणो.


राष्ट्रे उठावणी करून यहोशाफाटाच्या खोर्‍यात येवोत; तेथे मी न्यायासनावर बसून सभोवतालच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे.


तो देशोदेशींच्या बहुत लोकांचा न्याय करील, दूर असलेल्या बलवान राष्ट्रांचा न्याय ठरवील, तेव्हा ते आपल्या तलवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांचे कोयते करतील; ह्यापुढे एक राष्ट्र दुसर्‍या राष्ट्रावर तलवार उचलणार नाही; ते येथून पुढे युद्धकला शिकणार नाहीत.


एफ्राइमातले रथ, यरुशलेमेतले घोडे मी नष्ट करीन; युद्धधनुष्य तोडून टाकण्यात येईल, तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल; त्याचे आधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून ते पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल.


त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे.”


‘नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला’, तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. ‘तो नीतीने न्यायनिवाडा करतो’ व लढतो.


परमेश्वराशी झगडणार्‍यांचा चुराडा होईल. तो त्यांच्यावर आकाशातून गर्जेल; परमेश्वर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत न्याय करील; तो आपल्या राजाला बल देईल, तो आपल्या अभिषिक्ताचा उत्कर्ष करील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan