Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 19:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तेव्हा धीवर शोक करतील; नील नदीत गळ टाकणारे सर्व विलाप करतील; पाण्यावर पाग टाकणारे म्लान होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 कोळी विलाप आणि शोक करतील व जे सर्व नील नदीत गळ टाकणारे शोक करतील त्यासारखे जे पाण्यावर जाळी पसरतात ते दुःखीत होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जे नाईल नदीत आकड्या टाकतात, ते सर्व कोळीसुद्धा रडतील आणि विलाप करतील; जे पाण्यावर जाळे टाकतात ते झुरणीस लागतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 19:8
6 Iomraidhean Croise  

नदीतले मासे मेले, तिला घाण सुटली आणि मिसरी लोकांना नदीतले पाणी पिववेना; सार्‍या मिसर देशात रक्तच रक्त झाले.


तिच्या तीरी धीवर उभे राहून एन-गेदीपासून एन-इग्लाइमापर्यंत पाग टाकतील; महासागरातल्या माशांप्रमाणे त्या नदीत भिन्नभिन्न जातींचे विपुल मासे सापडतील.


तो त्या सर्वांना गळाने उचलतो, त्यांना आपल्या जाळ्यात धरतो, आपला पाग टाकून त्यांना गोळा करतो; त्यामुळे तो हर्षित व आनंदित होतो.


तर मग तो आपले भरलेले जाळे रिकामे करून राष्ट्रांची काहीएक गय न करता त्यांचा सतत घात करत राहील काय?


मिसर देशात आम्हांला मासे फुकट खायला मिळत असत त्याची आठवण आम्हांला येते. त्याचप्रमाणे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण ह्यांचीही आम्हांला आठवण येते;


‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला, तरी तुम्ही नाचला नाहीत; आम्ही आक्रोश केला, तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाहीत,’ त्यांच्यासारखी ही पिढी आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan