Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 19:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 त्या दिवशी मिसर व अश्शूर ह्यांचा इस्राएल हा तिसरा सोबती बनेल व पृथ्वीला मंगलप्रद होईल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 त्या दिवसात इस्राएल मिसराशी व अश्शूराशी मिळालेला असा तिसरा सोबती होईल; तो पृथ्वीच्यामध्ये आशीर्वाद होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 त्या दिवशी इजिप्त आणि अश्शूरबरोबर इस्राएल हे पृथ्वीवरील तिसरे आशीर्वादित राष्ट्र असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 19:24
22 Iomraidhean Croise  

मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील;


त्या दिवशी मिसराहून अश्शूरास हमरस्ता होईल; अश्शूर मिसरात व मिसर अश्शूरात येईलजाईल; मिसर अश्शूराबरोबर उपासना करील.


कारण सेनाधीश परमेश्वराने त्यांना हा आशीर्वाद दिला : “माझी प्रजा मिसर धन्य असो; माझ्या हातची कृती अश्शूर धन्य असो; आणि माझे वतन इस्राएल धन्य असो.”


त्या दिवशी असे होईल की एक मोठा कर्णा वाजेल; तेव्हा अश्शूर देशात गडप झालेले व मिसर देशात परागंदा झालेले लोक येतील आणि यरुशलेमेतील पवित्र डोंगरावर परमेश्वराला दंडवत घालतील.


प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी राष्ट्रांना आपल्या हाताने इशारा करीन, लोकांसमोर आपला झेंडा उभारीन; ते तुझ्या पुत्रांना आपल्या उराशी धरून आणतील; तुझ्या कन्यांना खांद्यांवर बसवून पोहचत्या करतील.


तो परमेश्वर म्हणतो; “याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्राएलाच्या राखून ठेवलेल्या लोकांना परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे ह्यात काही मोठेसे नाही; तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो.”


त्यात लोकांचा दहावा हिस्सा राहिला तर त्याचाही नाश व्हायचा; तरी एला व अल्लोन ही झाडे तोडल्यावर ज्याप्रमाणे त्यांचा बुंधा राहतो त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील.”2


ते घरे बांधतील आणि त्यांत दुसरे राहतील, ते लावणी करतील आणि फळ दुसरे खातील, असे व्हायचे नाही; कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील.


परमेश्वर असे म्हणतो, “द्राक्षांच्या घोसात नवा द्राक्षारस दृष्टीस पडला असता ‘त्यात लाभ आहे म्हणून ह्याचा नाश करू नका’ असे लोक म्हणतात; त्याप्रमाणे मी आपल्या सेवकांस्तव करीन; मी अवघ्यांचा नाश करणार नाही.


कारण परमेश्वर म्हणतो, “पाहा, नदीप्रमाणे शांती व पाण्याच्या पुराप्रमाणे राष्ट्रांचे वैभव मी तिच्याकडे वाहवतो; तुम्ही स्तनपान कराल, तुम्हांला कडेवर वागवतील, मांडीवर खेळवतील.


मी त्यांना व माझ्या डोंगराभोवतालच्या स्थळांना मंगलदायक करीन; पाऊस योग्य ऋतूत पडेल असे मी करीन; मंगलदायक वृष्टी होईल.


हे यहूदाच्या घराण्या व इस्राएलाच्या घराण्या, असे होईल की, जे तुम्ही राष्ट्रांत शापरूप होता त्या तुमचा उद्धार मी करीन व तुम्ही आशीर्वादरूप व्हाल; भिऊ नका, तुमचे हात दृढ होवोत.”


ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या ‘इस्राएल’ लोकांचे ‘वैभव’ असे आहे.”


त्यांना बरे वाटले होते खरे आणि ते त्यांचे ऋणी आहेत; कारण जर परराष्ट्रीय त्यांच्या आध्यात्मिक गोष्टींचे अंशभागी झाले आहेत, तर ऐहिक गोष्टींत त्यांची सेवा करण्यास ते त्यांचे ऋणी आहेत.


ह्यात उद्देश हा की, अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा; म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे.


राष्ट्रांनो, त्याच्या प्रजेचा जयजयकार करा; कारण तो आपल्या सेवकांच्या रक्तपाताचा बदला घेईल, तो आपल्या विरोधकांचा सूड उगवील, तो आपला देश व आपली प्रजा ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan