Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 19:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 परमेश्वर मिसर देशास मारील; मारील व बरेही करील; ते परमेश्वराकडे वळतील आणि तो त्यांची विनंती ऐकेल व त्यांना बरे करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 परमेश्वर मिसराला पीडील, पीडील व बरे ही करील. ते परमेश्वराकडे परत येतील; तो त्यांची प्रार्थना ऐकेल व त्यांना बरे करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 याहवेह इजिप्तवर महामारीच्या साथीने हल्ला करतील; ते त्यांच्यावर हल्ला करतील आणि त्यांना बरे करतील. ते याहवेहकडे वळतील आणि ते त्यांच्या विनवणीला प्रतिसाद देतील आणि त्यांना बरे करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 19:22
21 Iomraidhean Croise  

“परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिज्कीया ह्याला सांग, तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुला बरे करतो. तू आजपासून तिसर्‍या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील.


तू सर्वसमर्थाकडे वळलास आपल्या डेर्‍यातून तू अधर्म दूर केलास, तर तुझी पुन्हा उभारणी होईल.


कारण दुखापत तो करतो आणि पट्टीही तोच बांधतो; घाय तो करतो आणि त्याचाच हात तो बरा करतो.


तुझ्या व तुझ्या लोकांच्या, आणि तुझ्या सर्व सेवकांच्या अंगांवर बेडूक चढतील.”’


त्या दिवशी असे होईल की अश्शूर, मिसर, पथ्रोस, कूश, एलाम, शिनार, हमाथ व समुद्रतीरींचे प्रदेश येथून प्रभू आपल्या लोकांचा अवशेष आपल्या हाताने खरेदी करून दुसर्‍यांदा सोडवील.


त्या दिवशी असे होईल की एक मोठा कर्णा वाजेल; तेव्हा अश्शूर देशात गडप झालेले व मिसर देशात परागंदा झालेले लोक येतील आणि यरुशलेमेतील पवित्र डोंगरावर परमेश्वराला दंडवत घालतील.


ज्या दिवशी परमेश्वर आपल्या लोकांचे घाव बांधील, त्यांच्या प्रहाराच्या जखमा बर्‍या करील, त्या दिवशी चंद्रप्रकाश सूर्यप्रकाशासारखा आणि सूर्यप्रकाश सात दिवसांच्या प्रकाशाएवढा सातपट होईल.


परमेश्वर असे म्हणतो, “मिसराच्या श्रमाचे फळ, कूशाची कमाई व धिप्पाड सबाई लोक तुझ्याजवळ येऊन तुझे होतील; ते तुझ्यामागून येतील; बेड्या घातलेले येतील, तुला दंडवत घालतील. ते तुला विनंती करून म्हणतील की : ‘खरोखर तुझ्याजवळ देव आहे, दुसरा कोणी नाही, दुसरा कोणीच देव नाही.”’


दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याच्यावर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.


मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन; मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्याचे, त्याच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन.


ह्या लोकांनी डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून व मनाने समजून माझ्याकडे वळून सुधारू नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधिर कर व त्यांचे डोळे चिपडे कर.”


प्रभू परमेश्वर म्हणतो की, चाळीस वर्षे संपल्यावर मिसरी लोकांची ज्या राष्ट्रांत पांगापांग झाली त्यांतून मी त्यांना गोळा करीन;


हे इस्राएला, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस.


ते आपल्या दोषाचे फळ भोगून माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होईपर्यंत मी आपल्या स्थानी जाऊन राहीन; ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील :


तो दोन दिवसांत आमचे पुनरुज्जीवन करील; तिसर्‍या दिवशी तो आम्हांला उठवून उभे करील; आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू.


‘आता पाहा, मी, मीच तो आहे, माझ्याशिवाय कोणी देव नाही; प्राणहरण व प्राणदान करणारा मीच आहे. मी घायाळ करतो आणि मीच बरे करतो; माझ्या हातून सोडवणारा कोणी नाही.


कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan