यशायाह 19:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्या दिवशी परमेश्वर मिसर्यांना आपली ओळख देईल व मिसरी परमेश्वराला ओळखतील; ते यज्ञ व बली अर्पून त्याची उपासना करतील; ते परमेश्वराला नवस करतील व तो फेडतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्या काळी परमेश्वर मिसऱ्यांस ओळख करून देईल आणि मिसरी परमेश्वरास ओळखतील. ते यज्ञ व अर्पणासह उपासना करतील आणि बली अर्पण करतील. ते परमेश्वरास नवस करतील आणि तो पूर्ण करतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तेव्हा याहवेह स्वतःला इजिप्तच्या लोकांस प्रगट करतील आणि त्या दिवशी ते याहवेह यांना स्वीकारतील. यज्ञार्पणे आणि धान्यार्पणे यांच्यासहित ते आराधना करतील; ते याहवेहकडे शपथ वाहतील आणि त्याचे पालन करतील. Faic an caibideil |
ज्याला माणसे तुच्छ लेखतात, ज्याला लोक अमंगल मानतात, जो अधिपतींचा दास आहे, त्याला इस्राएलाचा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू जो परमेश्वर, तो म्हणतो, “राजे तुला पाहून उठून उभे राहतील, अधिपती तुला नमन करतील. परमेश्वर जो सत्यवचनी आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे, त्याने तुला निवडून घेतले आहे म्हणून असे होईल.”