Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 19:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 ही मिसर देशात सेनाधीश परमेश्वराचे चिन्ह व साक्ष अशी होतील; आपणांवर जुलूम करणार्‍यांमुळे लोक परमेश्वराचा धावा करतील तेव्हा तो एक उद्धारक व कैवारी पाठवून त्यांना मुक्त करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 ही मिसर देशात सेनाधीश परमेश्वराचे चिन्ह व साक्ष अशी होतील. कारण ते जुलूमामुळे परमेश्वराकडे जेव्हा आरोळी मारतील तेव्हा तो त्यांच्यासाठी एक तारणारा व संरक्षणकर्ता पाठवील, आणि तो त्यांना सोडवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 इजिप्त देशामध्ये सर्वसमर्थ याहवेहसाठी ते एक चिन्ह आणि साक्ष असतील. जेव्हा ते त्यांच्या जुलमी लोकांमुळे याहवेहकडे धावा करतील, तेव्हा ते त्यांच्याकडे एक तारणारा आणि रक्षक पाठवतील आणि ते त्यांना सोडवतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 19:20
23 Iomraidhean Croise  

आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


बराच काळ लोटल्यावर मिसराचा राजा मृत्यू पावला; इकडे इस्राएलवंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत, आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहचली.


परमेश्वर म्हणाला, “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे;


मी मिसर्‍यांना एका कठोर धन्याच्या हाती देईन; एक उग्र राजा त्यांच्यावर सत्ता करील असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


तसा अश्शूर देशाचा राजा मिसरातील बंदिवान व कूशाचे हद्दपार केलेले तरुण व म्हातारे ह्यांना उघडे, अनवाणी व उघड्या कुल्ल्यांनी, मिसर देश फजीत व्हावा म्हणून घेऊन जाईल.


मग परमेश्वराच्या दिव्यदूताने जाऊन अश्शूरी गोटातल्या एक लक्ष पंचाऐंशी हजार लोकांना मारले; पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते!


मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही.


कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे; मी तुझ्यासाठी मिसर खंडादाखल दिला आहे, तुझ्याबद्दल कूश व सबा दिले आहेत.


हे इस्राएलाच्या देवा, तारका, तू खचीत गूढ देव आहेस.


परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांना फुकट धरून नेले आहे, आणि आता मी येथे काय करू? परमेश्वर म्हणतो, त्यांच्यावर प्रभूत्व करणारे गर्जना करीत आहेत, दिवसभर एकसारखी माझ्या नामाची निंदा होत आहे.


काटेर्‍याच्या जागी सरू उगवेल, रिंगणीच्या जागी मेंदी उगवेल; ह्यावरून परमेश्वराचे नाव होईल; ते सर्वकाळचे चिन्ह होईल, ते कधी नष्ट होणार नाही.”


तू राष्ट्रांचे दूध शोषून घेशील, राजांचे स्तन तू चोखशील, आणि मी परमेश्वर तुला तारणकर्ता, उद्धारकर्ता याकोबाचा समर्थ प्रभू आहे हे तू जाणशील.


कारण तो म्हणाला, खरोखर हे माझे लोक आहेत, कधीही लबाडी करणार नाहीत अशी ही मुले आहेत; म्हणून तो त्यांचा त्राता झाला.


ती ही की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे.


पाहा, ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली त्यांची ‘तुम्ही’ अडकवून ठेवलेली ‘मजुरी ओरडत आहे;’ आणि कापणी करणार्‍यांचा आक्रोश ‘सेनाधीश प्रभूच्या कानी’ गेला आहे.


रऊबेनी व गादी ह्यांनी त्या वेदीचे नाव एद (साक्ष) असे ठेवले; कारण ते म्हणाले, “परमेश्वर हाच देव आहे, ह्याबद्दल ही वेदी आपल्यामध्ये साक्ष आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan