Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 19:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मी मिसर्‍यांवर मिसरी उठवीन; प्रत्येक आपल्या भावाबरोबर व प्रत्येक आपल्या शेजार्‍याबरोबर, नगर नगराशी, राज्य राज्याशी लढेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 देव म्हणतो, मी मिसऱ्यांना मिसराविरूद्ध चिथावेल, ते माणसे आपल्या भावाविरूद्ध, आणि आपल्या शेजाऱ्याविरूद्ध; नगर नगराविरूद्ध आणि राज्य राज्याविरूद्ध लढेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “मी इजिप्तच्या लोकांना इजिप्तच्या लोकांविरुद्ध चिथावेन— भाऊ भावाविरुद्ध लढेल, शेजारी शेजार्‍याविरुद्ध, शहर शहराविरुद्ध, राज्य राज्याविरुद्ध.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 19:2
20 Iomraidhean Croise  

तेव्हा इस्राएल लोकांचे दोन भाग झाले; अर्धे लोक गीनथाचा पुत्र तिब्नी ह्याला राजा करावे म्हणून त्याच्या पक्षाचे झाले, व अर्धे लोक अम्रीच्या पक्षाचे झाले.


राष्ट्रावर राष्ट्र उलटून व नगरावर नगर उलटून त्या सर्वांचा चुराडा होत असे, कारण देव नाना प्रकारचे कष्ट देऊन त्यांना त्रस्त करीत असे;


हा त्याला व तो ह्याला, असे लोक एकमेकांना पिडतील; मुलगा वडिलांशी व हलका प्रतिष्ठितांशी दांडगाईने वर्तेल.


मनश्शे एफ्राइमाला खातो, आणि एफ्राईम मनश्शेला खातो; ते दोघे मिळून यहूदाला विरोध करतात. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


राष्ट्रांनी तुझी अपकीर्ती ऐकली आहे, तुझ्या आक्रोशाने पृथ्वी भरली आहे; कारण वीराला वीर टक्कर देऊन एकत्र पडत आहेत.”


देशात ऐकलेल्या अफवेने तुम्ही आपले मन खचू देऊन घाबरू नका; एक अफवा एका वर्षी व दुसरी दुसर्‍या वर्षी पसरेल; देशात जुलूम होईल, अधिपती अधिपतीवर उठेल.


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या सर्व पर्वतांकडे त्याच्याविरुद्ध मी तलवार बोलावीन; प्रत्येकाची तलवार आपल्या भावावर चालेल.


त्या दिवसांपूर्वी माणसास मजुरी मिळत नसे, पशूबद्दल भाडे मिळत नसे व येणार्‍याजाणार्‍यास शत्रूमुळे स्वास्थ्य मिळत नसे; कारण माणसांनी एकमेकांवर उलटावे असे मी केले.


भाऊ भावाला व बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, ‘मुले आईबापांवर उठून’ त्यांना ठार करतील;


आणि ‘मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.’


येशूने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसांत फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसांत फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही.


कारण ‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल’ आणि जागोजागी दुष्काळ, मर्‍या व भूमिकंप होतील;


आपसांत फूट पडलेले राज्य टिकत नाही.


त्यांनी ती तीनशे रणशिंगे फुंकली तेव्हा परमेश्वराने प्रत्येक माणसाची तलवार त्याच्या सोबत्यांवर व सर्व सेनेवर चालवली; तेव्हा ती सेना सरेराजवळच्या बेथ-शिट्टापर्यंत व टब्बाथाजवळच्या आबेल-महोलाच्या सीमेपर्यंत पळून गेली.


त्यानंतर देवाने अबीमलेख व शखेमकर ह्यांच्यामध्ये वैमनस्य उत्पन्न करणारा दुरात्मा पाठवला आणि शखेमकर अबीमलेखाशी कपटाने वागू लागले.


इकडे बन्यामिनाच्या गिब्यातल्या शौलाच्या पहारेकर्‍यांनी पाहिले तेव्हा लोकसमुदाय पांगला व लोक सैरावैरा धावू लागले.


मग शौल व त्याच्याबरोबरचे सर्व लोक एकत्र जमून लढाईला गेले; तेव्हा प्रत्येकाची तलवार त्याच्या-त्याच्या सोबत्यावर चालून ते पराकाष्ठेचे घाबरून गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan