Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 19:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 त्या दिवशी मिसर देशाच्या मध्ये परमेश्वरासाठी वेदी होईल व त्याच्या सीमेवर परमेश्वरासाठी स्तंभ होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 त्या दिवशी मिसर देशाच्या मध्ये परमेश्वरासाठी एक वेदी होईल आणि त्याच्या सीमेवर परमेश्वरासाठी एक दगडी स्तंभ होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्या दिवशी इजिप्तच्या मध्यभागी याहवेहसाठी वेदी असेल आणि त्यांच्या सीमेवर याहवेह यांचे स्मारक असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 19:19
19 Iomraidhean Croise  

परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या संतानाला देणार.” परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली.


याकोब पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशाला घेतला होता त्याचा त्याने स्मारकस्तंभ उभारून त्याला तेलाचा अभ्यंग केला.


मिसर देशातून सरदार येतील; कूश आपले हात देवाकडे पसरण्याची त्वरा करील.


मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली. अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी त्याने एक वेदी बांधली, आणि इस्राएलाच्या बारा वंशांप्रमाणे बारा स्तंभ उभारले.


त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थनामंदिरात त्यांना हर्षित करीन; माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम व यज्ञ मला पसंत होतील; कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनामंदिर आहे असे म्हणतील.


केदारचे सर्व कळप तुझ्याजवळ एकत्र होत आहेत; नबायोथचे एडके तुझ्या कामी येतील; ते मला पसंत पडून माझ्या वेदीवर चढतील, आणि मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवीन.


असे होईल की, एका चंद्रदर्शनापासून दुसर्‍या चंद्रदर्शनापर्यंत, एका शब्बाथापासून दुसर्‍या शब्बाथापर्यंत सर्व मनुष्यजाती माझ्यापुढे भजनपूजन करण्यास येईल, असे परमेश्वर म्हणतो.


मिसराविषयी : मिसर देशाचा राजा फारो नखो ह्याचे सैन्य कर्कमीशाजवळ फरात नदीच्या काठी होते, यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने त्या सैन्याचा निःपात केला त्याविषयी :


दहाव्या वर्षी दहाव्या महिन्याच्या द्वादशीस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


अकराव्या वर्षी, तिसर्‍या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की :


बाराव्या वर्षी, बाराव्या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


“मग जे दूर आहेत ते येतील व परमेश्वराचे मंदिर बांधण्यास हातभार लावतील आणि सेनाधीश परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे हे तुम्हांला कळून येईल. परमेश्वर तुमचा देव ह्याचे तुम्ही लक्ष देऊन ऐकाल तर हे घडून येईल.”


आपल्याला अशी वेदी आहे की जिच्यावरचे खाण्याचा अधिकार मंडपाची सेवा करणार्‍यांना नाही.


जेव्हा रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक कनान देशातील यार्देनथडीच्या प्रदेशात आले तेव्हा त्यांनी यार्देनेजवळ एक मोठी वेदी बांधली.


म्हणून आम्ही म्हटले की, चला, आपण एक वेदी बांधू; ती होमबली अथवा यज्ञबली अर्पण करण्यासाठी नव्हे,


तर ती तुमच्या-आमच्यामध्ये व आमच्यामागून आमच्या व तुमच्या पिढ्यांमध्ये साक्ष व्हावी, ह्यासाठी की आम्ही होमबली, यज्ञबली व शांत्यर्पणे करून परमेश्वरासमोर उपासना करावी, म्हणजे परमेश्वराशी तुम्हांला काही कर्तव्य नाही असे पुढील काळी तुमच्या मुलांनी आमच्या मुलांना म्हणू नये.


आम्ही म्हटले, पुढे जेव्हा ते लोक आम्हांला किंवा आमच्या वंशजांना असे म्हणतील, तेव्हा आम्ही त्यांना सांगू, परमेश्वराच्या वेदीचा हा नमुना पाहा; आमच्या पूर्वजांनी ती होमबली अथवा यज्ञबली अर्पण करण्यासाठी बांधलेली नाही, पण ती तुमच्या-आमच्यामध्ये साक्षीदाखल आहे.


रऊबेनी व गादी ह्यांनी त्या वेदीचे नाव एद (साक्ष) असे ठेवले; कारण ते म्हणाले, “परमेश्वर हाच देव आहे, ह्याबद्दल ही वेदी आपल्यामध्ये साक्ष आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan