Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 19:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 त्या दिवशी मिसर देशाची पाच नगरे कनान देशाची भाषा बोलतील; ती सेनाधीश परमेश्वरापुढे एकनिष्ठतेची शपथ वाहतील; त्यांपैकी एकाला ईर-हरेस (विनाशनगर) म्हणतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 त्या दिवशी मिसर देशामध्ये पाच नगरे कनानाची भाषा बोलतील आणि ती सेनाधीश परमेश्वरापुढे एकनिष्ठतेची शपथ वाहतील. त्यातील एका नगरास सूर्याचे नगर म्हणतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 त्या दिवशी इजिप्तमधील पाच शहरे कनान देशाची भाषा बोलतील आणि सर्वसमर्थ याहवेह यांच्याबरोबर एकनिष्ठतेची शपथ घेतील. त्यापैकी एकाला सूर्याचे शहर म्हटले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 19:18
15 Iomraidhean Croise  

सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती.


आपले भाऊबंद व महाजन ह्यांच्याशी एकचित्त होऊन आणभाक केली की जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे ह्याच्या द्वारे देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही वागू आणि आमचा प्रभू परमेश्वर ह्याच्या सर्व आज्ञा, निर्णय व नियम लक्षपूर्वक पाळू; असे न केल्यास आम्हांला शाप लागो.


मिसर देशातून सरदार येतील; कूश आपले हात देवाकडे पसरण्याची त्वरा करील.


त्या दिवशी असे होईल की अश्शूर, मिसर, पथ्रोस, कूश, एलाम, शिनार, हमाथ व समुद्रतीरींचे प्रदेश येथून प्रभू आपल्या लोकांचा अवशेष आपल्या हाताने खरेदी करून दुसर्‍यांदा सोडवील.


कारण याकोबावर परमेश्वर दया करील; तो पुन्हा इस्राएलास निवडून घेईल, त्यांना त्यांच्या स्वदेशात वसवील; त्यांना परके येऊन मिळतील; ते याकोबाच्या घराण्याशी लगटून राहतील.


त्या दिवशी मिसर देशाच्या मध्ये परमेश्वरासाठी वेदी होईल व त्याच्या सीमेवर परमेश्वरासाठी स्तंभ होईल.


त्या दिवशी परमेश्वर मिसर्‍यांना आपली ओळख देईल व मिसरी परमेश्वराला ओळखतील; ते यज्ञ व बली अर्पून त्याची उपासना करतील; ते परमेश्वराला नवस करतील व तो फेडतील.


त्या दिवशी लोकांची उन्मत्त दृष्टी नीच होईल, माणसांचा गर्व उतरेल; व परमेश्वरच काय तो उच्च स्थानी विराजेल.


त्या दिवशी असे होईल की एक मोठा कर्णा वाजेल; तेव्हा अश्शूर देशात गडप झालेले व मिसर देशात परागंदा झालेले लोक येतील आणि यरुशलेमेतील पवित्र डोंगरावर परमेश्वराला दंडवत घालतील.


म्हणून देशातला जो आपणास धन्य म्हणवील तो सत्य देवाच्या नामाने आपणास तसा म्हणवील; देशातला जो शपथ वाहील तो ती सत्य देवाच्या नामाची वाहील; कारण पूर्वीच्या कष्टांचा विसर पडला आहे व ते माझ्या दृष्टिआड झाले आहेत.


ते जर माझ्या लोकांच्या चालीरीती मन लावून शिकतील म्हणजे त्यांनी माझ्या लोकांना ज्याप्रमाणे बआलमूर्तीची शपथ घेण्यास शिकवले त्याप्रमाणे ‘परमेश्वराच्या जीविताची,’ ‘माझ्या नामाची शपथ’ वाहण्यास शिकतील तर ते माझ्या लोकांमध्ये वसतील.


तेव्हा मी राष्ट्रांना शुद्ध वाणी देईन, व परमेश्वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने1 करतील.


त्या दिवसांत बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील; मी तुझ्या ठायी वस्ती करीन, मग तुला समजेल की, सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे.


आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून राहा आणि त्याच्याच नावाने शपथ वाहा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan