Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 19:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 त्या काळी मिसरी लोक बायकांसारखे होतील; सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर आपला हात उगारील त्यामुळे ते थरथर कापतील व भयभीत होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 त्या दिवशी मिसरी बायकांसारखे होतील. ते थरथर कापतील आणि भयभीत होतील कारण सेनाधीश परमेश्वर आपला हात वर उंचावेल तो त्यांच्यावर उगारील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्या दिवशी इजिप्तचे लोक दुर्बल होतील. सर्वसमर्थ याहवेहनी त्यांच्याविरुद्ध उगारलेल्या हाताच्या धाकामुळे ते घाबरून थरकापतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 19:16
18 Iomraidhean Croise  

तेथे त्यांना कंप सुटला; त्यांना प्रसूतिवेदनांप्रमाणे वेदना झाल्या


पूर्वी कधी झाला नव्हता आणि पुढे कधी होणार नाही असा मोठा हाहाकार मिसर देशभर उडेल.


त्याचा आजचा मुक्काम नोबास आहे; तो सीयोनकन्येच्या डोंगराला, यरुशलेमेच्या टेकडीला, हाताने धमकावत आहे.


परमेश्वर मिसरी समुद्राची खाडी नष्ट करील; तो आपला उष्ण श्वास सोडून आपला हात नदावर (फरातावर) परजील; त्यावर प्रहार करून त्याचे सात फाटे करील; त्यांवरून लोकांना जोडे घालून जाता येईलसे करील.


उघड्या डोंगरावर ध्वज उभारा, लोकांना मोठ्याने हाका मारा; हाताने खुणवा म्हणजे ते सरदारांच्या वेशीत प्रवेश करतील.


एकाच्या धमकीने तुमचे हजार पळतील, पाचांच्या धमकीने तुम्ही पळाल; डोंगरमाथ्यावरील एखाद्या ध्वजस्तंभा-सारखे, टेकडीवरील ध्वजेसारखे तुम्हीच तेवढे शेष उराल.


त्याच्या घोड्यांवर, त्याच्या रथांवर व त्यांच्यात राहणार्‍या सर्व मिश्र जातींवर तलवार उपसली आहे, ते स्त्रिया बनतील! त्याच्या निधींवर तलवार उपसली आहे, ते लुटीस जातील!


बाबेलचे वीर लढाई करायचे थांबले आहेत, ते आपल्या दुर्गात बसून राहिले आहेत; त्यांचे बल खुंटले आहे. ते केवळ स्त्रिया बनले आहेत; त्याच्या वस्तीस आग लावली आहे; त्याचे अडसर मोडले आहेत.


अरे तेमाना, तुझे वीर कच खातील, म्हणजे प्रत्येकाचा वध होऊन एसावाच्या पहाडातून सर्व नष्ट होतील.


पाहा, तुझ्यात राहणारे लोक केवळ स्त्रिया आहेत; तुझ्या देशाचे दरवाजे तुझ्या शत्रूंना खुले झाले आहेत; अग्नीने तुझे अडसर खाऊन टाकले आहेत.


तो संकटसमुद्रातून पार जाऊन समुद्रलहरींना दबकावील; नील नदीचे सर्व गहिरे पाणी सुकून जाईल. अश्शूराचा गर्व उतरेल, मिसरचे राजवेत्र निघून जाईल.


सर्व मानवहो, परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासातून उठला आहे.


“पाहा, मी आपला हात त्यांच्यावर उगारीन, व त्यांची सेवा करणारे त्यांना लुटतील; तेव्हा तुम्हांला समजेल की, सेनाधीश परमेश्वराने मला पाठवले आहे.


आणि मी तअशक्त, भयभीत व अतिकंपित असा झालो.


म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसांची समजूत घालतो; देवाला तर आम्ही प्रकट झालोच आहोत; आणि तुमच्या सदसद्विवेकबुद्धीतही प्रकट झालो आहोत अशी आशा मी धरतो.


जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan